मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा आज अजित पवार गटाकडून आयोजिण्यात आला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकच सत्कार नाही, तर अनेकांनी त्यांचा सत्कार केला. राज्यातील विविध जाती-धर्मातील महिलांनी त्यांना वैशिष्ट्यपूर्ण भेट दिली.
12 जिल्ह्यांतर्फे सत्कार सोहळा
राष्ट्रवादी काँग्रेस Ajit Pawar गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई महिला मेळावा आयोजिला होता. सर्व जिल्ह्यांतील महिला या मेळाव्यासाठी उपस्थित होत्या. 12 जिल्ह्यांतील महिलांनी त्यांचा सत्कार त्यांच्या जातीतील टोप्या आणि विविध वस्तू देऊन केला.
पुणेरी टोपी, दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती, त्यांचसोबत मुस्लिम महिलावर्गाकडून त्यांच्या पद्धतीची टोपी भेट दिली. कोकण विभागातील महिलांनी अजित पवारांना नाव भेट म्हणून दिली, तर काही जणींनी अजितदादांना आई जिजाऊची मूर्ती भेट दिली. या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे अजित पवार यांच्या हातात असलेल्या धनुष्यबाणाने. अजित पवार यांना आदिवासी समाजाकडून लाकडाचं धनुष्यबाण आणि टोपी भेट म्हणून देण्यात आली. अशा 12 जिल्ह्यांतील महिलांनी त्यांना विविध भेटवस्तू दिल्या.
आपल्या घड्याळाची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी भव्य महिला मेळाव्यात केले. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महिलांची प्रचंड शक्ती उभी राहिली आहे. हे यश भविष्यात असेच कायम मिळेल, असा विश्वासही सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो निर्धार केला आहे त्यांच्या पाठीमागे तुम्ही महिला खंबीरपणे उभ्या राहिल्या आहात. छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची राजधानी रायगडावर उभी केली. तोच छत्रपती शिवाजीमहाराजांचा विचार इथे रुजवण्याची गरज आहे, असेही सुनील तटकरे म्हणाले.
edited by sachin fulpagare
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.