Mumbai NCP News: राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आता मुंबईत पक्ष वाढवणार आहेत. त्यासाठी अजितदादांनी पक्षाच्या नेत्यांची बैठकही बोलावली आहे. बदलत्या राजकारणात मुंबईतील राजकारणात त्यांचा रस वाढत असून, आपल्या बाजुने आलेल्या आक्रमक, नव्या दमाच्या नेत्यांची फौज उभारून अजितदादा नवी खेळी खेळणार आहेत. मात्र, या खेळात ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा डाव साधणार असल्याचे संकेत आहेत. (Latest Political News)
राष्ट्रवादी काँग्रेसचा गेल्या तीन वर्षात मुंबई शहराध्यक्ष नसल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार व्यक्त केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे असल्याने त्यांना काहीही करता येत नव्हते. आता बंडानंतर अजित पवार गट मुंबईच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थित आज मंगळवारी (ता. २५) दुपारी ३ वाजता मुंबई राष्ट्रवादीची (अजित पवार गट) बैठक होत आहे. बैठकीमध्ये मुंबईतील संघटना बळकट करण्यासाठी पदाधिकारी नेमणूक आणि आगामी काळातील मुंबई महानगरपालिकेसाठीचे रणनीतीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईत जे शरद पवारांना जमले नाही ते अजित पवार करून दाखवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईचे शहराध्यक्षपद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असल्याची खंत पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त भरवलेल्या मेळाव्यात अजितदादांनी बोलून दाखवले होते. तसेच हे पद रिक्त ठेवण्यामागचे कारण काय, असाही सवाल उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या होत्या.
"माझ्याकडे पक्षकार्याची संधी द्या, राज्यात पक्ष वाढवून दाखवतो", अशी इच्छाही व्यक्त पावरांनी केली होती. यानंतर राष्ट्रवादीत बंड झाले आणि अजित पवार यांच्यासोबत आलेले ३५ हून अधिक आमदार सत्तेत सहभागी झाले. यानंतर आता पवारांनी मुंबईत राष्ट्रवादी पक्ष सक्रिय करण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली असून आज दुपारी मुंबई राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक होत आहे. या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.