Uddhav Thackeray Interview : ठाकरे-शिंदेंच्या संघर्षात 'खेकड्या'ची एन्ट्री ! आता कोण कुणाला नांगी मारणार ?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : इर्शाळवाडीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा ठाकरेंचा निर्णय
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama

Mumbai News : मुसळधार पावसाने नव्हे तर खेकड्यांनी धरण फोडल्याने माझे सरकार वाहून गेले अशा बोचऱ्या शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना थेट 'खेकडा' म्हणत डिवचल्याने शिवसेना फुटीनंतर सुरू झालेल्या ठाकरेविरुद्ध शिंदे गटाच्या संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यात भाजपच्या काही नेत्यांनीही उडी घेऊन ठाकरेंना टार्गेट करीत आहेत. (Latest Political News)

ठाकरे गटाने सुरू केलेल्या 'आवाज कुणाचा' या पॉडकास्ट मालिकेत खासदास संजय राऊतांनी घेतलेली उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दोन भागात २६ आणि २७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे 'टीझर' प्रसिद्ध झाले असून यात ठाकरेंनी काही स्फोटक गौप्यस्फोट केल्याची माहिती आहे. या 'टीझर'मध्येच ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुलना खेकड्याशी केली आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shivsena Disqualification Case : ठाकरे गटाची अस्वस्थता वाढणार; शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर पडणार?

शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ५४ आमदारांपैकी तब्बल ४० आमदारांनी बंड केले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर सुरू झालेल्या ठाकरे-शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत गेला. यावर ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना तिवरे घटनेतील खेकड्यांशी तुलना केल्याने मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर ठाकरे-शिंदे गट नव्या मुद्द्यांवरून आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

तिवरे धरणफुटीनंतर तत्कालीन जलसंधारण मंत्री तानाजी सावंतांनी खेकड्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने दुर्घटना झाल्याचा अजब दावा केला होता. या विधानाचा धागा पकडत शिवसनेतील तब्बल ४० आमदार फुटीला 'खेकडा' कारणीभूत असल्याचा खोचक टोला ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Ajit Pawar CM : फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतरही काँग्रेस आमदार म्हणतात, ‘अजितदादा मुख्यमंत्री होणारच’

उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर

गेल्या चार वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठ्या राजकीय उलथापालथ घडल्या आहेत. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी पाठीत वार केल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर फडणवीसांवर पलटवार करताना ठाकरे म्हणाले, "आम्ही खंजीर खुपसला, मग राष्ट्रवादीने काय केले की तुम्ही त्यांच्यासोबत गेलात." दिल्लीसमोर उठसूठ मुजरा करण्याची आमची संस्कृतीन नसल्याचा टोलाही ठाकरेंनी शिंदेंसह फडणवीसांना लगावला आहे.

वाढदिवस साजरा करणार नाही

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दरड कोसळल्याने त्यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. २७ जुलैला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com