Ajit Pawar : शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीच्या छगन भुजबळ, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी लोढांवर टीकेची झोड उठवली आहे. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ( Ajit Pawar lates News)
सुरुवातीपासूनच वाचाळवीरांना आवरा आवरा असं मी सांगत आहे. पण त्यांच्यात तर चुका करण्याची स्पर्धाच लागली आहे. हे सर्व महाराष्ट्रातील जनता पाहतेय. एकदा निवडणुका लागू द्या, मग यांना कळेल काय ते अशा शब्दांत अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारमधील वादग्रस्त विधानं करणार्यांचे कान टोचले.
अजित पवार ( Ajit Pawar)मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, वाचाळविरांना आवरा हे मी सातत्याने सांगत आहे. तरी यांच्या मनात काही कल्पना अशा येतात की, बोलायला एक जातात आणि अर्थ वेगळाच निघतो. एखाद्या माणसाला ठेच लागली की, अशाप्रकारे ठेच लागणार नाही यासाठी दुसरा प्रयत्न करत असतो. हे तर दिसत नाही. एकाने चूक केली की दुसर्याला बोलण्याची संधी मिळाली की तो चूक करतो. त्यानंतर तिसरा चूक करतो. यांच्यात तर चूका करण्याची स्पर्धाच लागली आहे. हे कधी थांबणार केव्हा थांबणार आहे काय माहित नाही.
मला तर असं कळलं की, एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, कुणाशी तुलना करतो, आपल्यावर जबाबदारी काय आहे, आपण कोणाची तुलना करतो, कसं वागलं आणि कसं बोललं पाहिजे, याचं भान असायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचं तारतम्यही या लोकांना राहिलं नाही आहे. हे सर्व महाराष्ट्रातील जनता पाहतेय. एकदा निवडणुका लागू द्या, मग यांना कळेल काय ते अशा शब्दांत अजित पवार यांनी लोढा यांचे कान टोचले.
काय घडलं?
किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळ्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडले असं वक्तव्य लोढा यांनी केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.