Ajit Pawar News : ...अन् अजितदादांचा पारा चढला; सरकारमधील मंत्र्यांना म्हणाले, 'राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का ?'

Shinde Government Cabinet Meeting : मुंबईमध्ये मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निधीवाटपावरून महायुती सरकारमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. संदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक विधानं आणि तितक्याच आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. कधी कधी ते चारचौघातही पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे कान टोचतात. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते स्वत: अडचणीत येतात.

अजितदादांच्या याच आक्रमक स्वभावामुळे प्रशासकीय अधिकारी आणि नेतेमंडळीही दोन हात अंतर ठेवून असतात. मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी अतिरिक्त निधी मागणाऱ्या मंत्र्यांना जोरदार खडसावलं.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची मंगळवारी (ता.23) अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत धडाकेबाज निर्णयांचा सिलसिला या महायुती सरकारने कायम राखला.

दिव्यांग कर्मचाऱ्यांना २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,गट-प्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपयांची मदत असे काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आला.पण ही बैठक वादळी ठरली. या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि मंत्र्‍यांमध्ये खडाजंगी झाली.

Ajit Pawar
MP Amol kolhe : 'दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो' खासदार कोल्हेंची अर्थसंकल्पावर टीका !

मुंबईमध्ये मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निधीवाटपावरून महायुती सरकारमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. संदर्भात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. गिरीश महाजन,गुलाबराव पाटील,विजयकुमार गावित या मंत्र्यांनी निधीची मागणी केली होती. पण मंत्र्यांनी मागितलेल्या अतिरिक्त निधीला अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नकार देण्यात आला.

राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का ?

मंत्रिमंडळ बैठकीत निधीची मागणी करणाऱ्या मंत्र्यांना अजित पवार यांचा सवाल केला आहे. राज्यात सध्या 7 महत्त्वाच्या योजना सरकार कडून राबवण्यात येत आहे.त्यामुळे जवळपास 1 लाख कोटी रुपये त्यात खर्च होत आहे.त्यामुळे निधीसाठी पैसे कुठून उभारण्यात येणार ? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.

अजित पवारांनी संबंधित मंत्र्‍यांना राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का असा खडा सवालही केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीच्या संदर्भात अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी आपली नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली.यावरुन आता निधीवाटपावरुन महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar
Gokul Zirwal : छाती फाडली, तर शरद पवार दिसतील, वडिलांविरोधात विधानसभेसाठी शड्डू; नरहरी झिरवाळांच्या पुत्राचं 'शरद पवार प्रेम'!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com