Ajit Pawar On Nitin Gadkari : 'लाडकी बहीण' योजनेवरून गडकरींचे सरकारला चिमटे; अजितदादा म्हणतात...

Ajit Pawar On Ladki Bahin Yojna : महिलांमध्ये ही योजना लोकप्रिय झाली आहे. त्याबद्दल सतत काहीजण टीका-टिप्पणी करतात. त्याकडे आम्ही लक्ष देत नाही, असं अजितदादांनी म्हटलं.
Nitin Gadkari | Ajit Pawar
Nitin Gadkari | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojna: राज्यासह देशात चर्चेची ठरलेल्या 'लाडकी बहीण' योजनेवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारला चिमटे काढले होते. 'लाडकी बहीण' योजनेसाठी इतर सबसिडीचा पैसा द्यावा लागत आहे. त्यामुळे उद्योजकांनी जी सबसिडी घ्यायची ती लवकर घ्या.

सरकार म्हणजे विषकन्या असते, ज्याच्यासोबत जाते त्याला बुडवते, अशा शब्दांत गडकरींनी घरचा आहेर दिला होता. या विधानानंतर नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करणार, असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे.

गडकरींनी काय म्हटलं?

नागपुरातील एका कार्यक्रमात गडकरी ( Nitin Gadkari ) म्हणाले, "कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी त्यापासून उद्योजकांनी दूर रहावे. सरकार म्हणजे विषकन्या असते. ज्याच्यासोबत जाते, त्याला बुडवते. 'लाडकी बहीण' योजनेसाठी इतर सबसिडीचा पैसा द्यावा लागत आहे. त्यामुळे जी सबसिडी घ्यायची ती लवकर घ्या. ती कधी मिळेल याचा काहीच भरवसा नाही."

"माझ्या मुलानेच सबसिडीबाबत मला विचारणा केली. मी त्याला म्हटलं, ईश्वराकडे प्रार्थना कर, सबसिडी कधी मिळेल माहिती नाही. सबसिडीचा पैसा लाडकी बहीण योजनेला द्यावा लागत आहे. त्यामुळे इतरांची सबसिडी अडकली आहे. काही दिवसांअगोदर टेक्सटाइल उद्योगांना पॉवर सबसिडी मिळाली नव्हती. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले आहेत. या गोष्टी लक्षात घेता, उद्योगांनी स्वत:च्या भरवशावर नियोजन करावे," असा सल्ला गडकरींनी दिला होता.

कुठलीही अडचण नाही..

गडकरींनी व्यक्त केलेल्या मताबद्दल प्रसारमाध्यमांनी अजितदादांना ( Ajit Pawar ) विचारलं. त्यावर अजितदादा म्हणाले, "गुंतवणूकरांना सरकार जमीन, पाणी आणि अन्य सवलती देते. एखादा कारखाना उभारल्यानंतर सरकार टॅक्समध्ये सवलत देते.

पण, नितीन गडकरी काय बोलले, याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेईन. परंतु, मी अर्थमंत्री म्हणून 10 वर्षे काम करत आहे. अशी कुठलीही अडचण असती, तर योजना आणल्या नसत्या. आम्हाला शक्य असलेल्या गोष्टी योजनांद्वारे करण्याचा प्रयत्न केला."

Nitin Gadkari | Ajit Pawar
Nitin Gadkari : पंतप्रधानपदाची ऑफर कोणी दिली होती, शरद पवार की सोनिया गांधी? नितीन गडकरी स्पष्टचं बोलले

"विरोधक आधी म्हणाले, 'सरकार पैसेच देणार नाही.' नंतर दोन हफ्त्यांचे पैसे मिळाले. परत, कुणीतरी म्हटलं, 'पैसे माघारी घेतील.' परत काहीजण म्हणाले, 'आमचं सरकार आल्यानंतर ही योजना बंद करू.' मात्र, महिलांमध्ये ही योजना लोकप्रिय झाली आहे. त्याबद्दल सतत काहीजण टीका-टिप्पणी करतात. त्याकडे आम्ही लक्ष देत नाही," असं अजितदादांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com