Ajit Pawar Silver Oak Visit : पहिल्या बंडात लपत लपत गेलेले अजित पवार आता उघडउघड 'सिल्व्हर ओक'ला गेले

NCP Political News : उपमुख्यमंत्रीपदी विराजमान पहिल्यांदाच ते सिल्व्हर ओकवर जात असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावरुन बोलणी फिस्कटल्यानंतर शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात सत्तेचा नवा मार्ग शोधला. त्यानंतर एकीकडे महाविकास आघाडीच्या सरकारची सत्तास्थापनेची तयारी सुरु असतानाच अचानक सकाळी सकाळी २३ नोव्हेंबर २०१९ देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

हे सरकार ७८ तासांतच कोसळले आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेले अजित पवार आल्यापावली 'सिल्व्हर ओक'ला माघारी परतले. आताही शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी शुक्रवारी(दि.१४) सिल्व्हर ओक गाठले. पण मागच्यावेळी लपून सिल्व्हर ओकवर आलेल्या अजित पवारांनी यावेळी मात्र थेट एन्ट्री घेतली.

Ajit Pawar
Sharad Pawar Letter to CM, DCM: शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह अजितदादांना पत्र...

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर व भाजपा- शिवसेना युती सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे शुक्रवारी (दि.१४) पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान पहिल्यांदाच ते सिल्व्हर ओकवर जात असल्याने सर्वांची नजर लागून आहे. मात्र, ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगण्यात येत आहे.

शरद पवार(Sharad Pawar) यांच्या पत्नी आणि अजित पवार यांच्या काकू प्रतिभा पवार यांची शस्त्रक्रिया झाल्याने ते हे सिल्व्हर ओकवर पोहचले आहेत. प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे. पहिल्यांदाच ते सिल्व्हर ओकवर जात गेल्याने सर्वांची नजर लागून आहे. मात्र, ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगण्यात येत आहे.

Ajit Pawar
Eknath Shinde News : तडजोड करावीच लागते; खातेवाटपावर मुख्यमंत्री शिंदेंची नरमाईची भूमिका

2019 मध्ये नेमकं काय घडलं..?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अडीच- अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री भाजपा शिवसेना युती तुटली. त्यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. आणि अचानक देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनपेक्षित घडामोडींमुळं त्यावेळेस राज्यभरात सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यातील दावे प्रतिदाव्यांमुळे मागील काही दिवसांपूर्वी राजकीय वातावरण तापलं होतं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com