Ajit Pawar : 6 महिन्यात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "...तर किंमत मोजावी लागेल"

Ajit Pawar On Supriya Sule statement : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर 6 महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट घेणार असल्याचा खळबळजनक दावा केला होता.
Supriya Sule, Ajit Pawar
Supriya Sule, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 22 Mar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर 6 महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट घेणार असल्याचा खळबळजनक दावा केला होता. महायुतीतील आणखी आणखी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल असं त्यांनी म्हटलं होतं.

त्यांच्या याच वक्तव्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अजितदादांनी कोणी गंभीर चुका केल्या असतील तर त्याला त्याची किंमत मोजावीच लागेल असं म्हटलं आहे. त्यामुळे सुळेंच्या वक्तव्यावर अजित पवारांनी देखील सूचक प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे.

Supriya Sule, Ajit Pawar
Opposition Complaint : सत्ताधारी मंडळीच्या पक्षपातीपणाबद्दल विरोधकांची तक्रार; राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष ?

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, "ज्यावेळी आम्ही मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काम करताना डोळ्यासमोर शपथ ठेवून फाईलवर सही असते. निर्णय घेताना, धोरण ठरवताना तसंच लोकांमध्ये वावरत असताना सर्व गोष्टींचं तारतम्य ठेवलं पाहिजे.

मात्र, यामध्ये जर कोणी गंबीर चुका केल्या आणि त्या विरोधकांनी दाखवल्या तर त्या मंत्र्याला त्याची किंमत मोजावी लागेल." दरम्यान, यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) राजीनामा का दिला याचं कारण देखील सांगितलं. ते म्हणाले, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी, सीआयडी नेमली आहे.

Supriya Sule, Ajit Pawar
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरची पोलिसांच्या हातावर तुरी? कोलकत्ता मार्गे दुबईला पलायन?

आत्तापर्यंत झालेल्या चौकशीत धनंजय मुंडे यांचे नाव कुठंही आलेलं नाही. मात्र. ज्यावेळी संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो व्हायरल झाले. ते पाहून आम्हालाही वेदना झाल्या. त्यानंतर आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि त्यानंतर मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com