Supriya Sule : '50 खोके इज नॉट ओके!'; सुप्रिया सुळे यांचा शिंदे, फडणवीस, अजितदादांना टोला

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar : भाजपने हा फोडाफोडीचा खटाटोप फक्त लोकसभा निवडणुकीसाठी केल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीची वाताहात झाली.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Maharashtra Political News : एकनाथ शिंदेंना शिवसेनेतून बाहेर काढून मुख्यमंत्री केले. त्यावरून त्यांच्यावर 50 खोके एकदम ओक्के अशी टीका होऊ लागली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. यामुळे शिंदे गटावर होणार 50 खोक्यांची टीका कमी झाली.

भाजपने हा फोडाफोडीचा खटाटोप फक्त लोकसभा निवडणुकीसाठी केल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीची वाताहात झाली, तर विरोधातील महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी विस्मृतीत गेलेला 50 खोक्यांचा आरोप पुन्हा उकरून काढत महायुतीला डिवचले आहे.

सुप्रिया सुळे Supriya Sule म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत राज्यातील मायबाप जनतेने घेतलेल्या निर्णयाने सर्वात मोठी ताकद ही एका मतामधे आहे, हेच दाखवून दिले आहे. आता धनशक्ती म्हणा किंवा कुठलीही शक्ती म्हणा, त्याला या निवडणुकीत देशाने नाकारले आहे. 50 खोके एकदम ओके हे सरकारला लागू पडत असेल. पण 50 खोके इज नॉट ओके, हे जनतेने स्पष्ट केले आहे, असे म्हणत सुळेंनी महायुतीतील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटावर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीचा निकाल आला आणि महायुतीला धक्का बसला. राज्यात भाजपच्या 'मिशन 45' ची अक्षरशः धुळधाण झाली. तर सर्वात जास्त 28 जागा लढवूनही भाजपला फक्त ९ जागा जिंकता आल्या. तर 15 जागा लढवून शिंदे गटाने 7, तर पाच जागापैकी अजित पवार Ajit Pawar गटास एक जागा मिळाली. सत्ताधारी महायुतीची मोठी पडझड होत असताना विरोधतील आघाडीने मात्र मोठी झेप घेतली. आघाडीच्या पक्षांनी चांगली कामगिरी करत 31 जागा जिंकल्या. यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरली.

Supriya Sule
Murlidhar Mohol : मंत्रि‍पद मिळताच काही तासांतच पुण्यात वादाची ठिणगी; सुळेंनी डिवचलं, मोहोळांचाही जशास तसा पलटवार

सत्तेत असूनही लोकांनी महायुतीला फोडाफोडीच्या राजकारणामुळे नाकारल्याची चर्चा आहे. तर विरोधातील उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूती मिळाल्यानेच राज्यातील संपूर्ण चित्र पालटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. निवडणुकीच्या निकालावरून सुळेंनी महायुतीला टार्गेट केले आहे. जनतेने मतदान करून धनशक्तीला नाकारल्याचा टोला लगावला. सत्ताधाऱ्यांना 50 खोके एकदम ओके वाटत असेल मात्र ते लोकांना रुचले नाही. जनतेने 50 खोके इज नॉट ओके असाच संदेश दिल्याचे सुळेंनी स्पष्ट केले.

Supriya Sule
Kalyan Kale : जरांगेंच्या आंदोलनाला वडेट्टीवारांनी विरोध केला असेल तर ते चुकीचे....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com