मोठी बातमी : अजित पवार पुन्हा होणार उपमुख्यमंत्री?; फडणवीसांसह भाजप नेते राजभवानकडे रवाना

अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार राजभवानाकडे रवाना झाले आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

संतोष मोरे

Maharashtra politic's : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. आज दुपारी दोन वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आणि इतर आमदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. (Ajit Pawar will take oath as Chief Minister)

दरम्यान, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार राजभवानाकडे रवाना झाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवनाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एका शपथविधीची खेळ रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com