Ajit Pawar News : बारसुप्रकरणात अजित पवारांची समन्वयाची भूमिका; म्हणाले, "प्रकल्पामुळे रोजगार...

Ajit Pawar News : "एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे."
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

Ajit Pawar On Barsu Refinery : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सुरू असलेल्या माती परीक्षणाला शुक्रवारी (ता. २८) स्थानिकांनी प्रचंड विरोध केला. पोलिसांनी मात्र त्यांना माती परीक्षण सुरु असलेल्या ठिकाणी जाण्यापासून रोखले. यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले होते. या प्रकल्पासंदर्भात आता विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Ajit Pawar News
Atique Ahmed Murder Case: आतिक-अशरफ खून प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाने युपी सरकारला महत्त्वाचे निर्देश

अजित पवार म्हणाले, "बारसू येथील प्रकल्पाला नेमका विरोध कशासाठी हे पाहिलं पाहिजे पाहिजे. तेथील मासेमारी उद्योगावर परिणाम होणार नसेल, तरूणांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार असेल तर या बाबीचाही विचार झाला पाहिजे. या प्रकल्पातून एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. विकासाच्या बाबतीत जनतेचा विरोध कशासाठी आहे, या ही गोष्टी विचारात घेतला पाहिजे. "

अजित पवार पुढे म्हणाले, "या प्रकल्पामुळे कायमचं नुकसान होणार असेल तर त्या बाबतीत विचार झाला पाहिजे. मात्र या उलट या प्रकल्पामुळे फायदा होणार असेल, आर्थिक सुबत्ता येणार असेल, तर सकारात्मक विचार केला पाहिजे, प्रकलाच्या भागाचं नुकसान होणार नसेल, तर विरोध करणाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे."

Ajit Pawar News
Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीत मतभेदाची ठिणगी; पवार - ठाकरेंमध्ये बिनसल्याची चर्चा!

"ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या प्रकल्प पत्र लिहलेलं आहे. त्यांनी स्थानिकांचा विरोध असेल, तर आपला विरोध असल्याची त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादीची भूमिका नेहमी विकासाच्या बाजूची राहिली आहे. या प्रकल्पामुळे रोजगार मिळणार असेल, दुष्परिणाम होणार नसेल, पर्यावरणाला बाधा येत नसेल, एकही घर उठवलं जात नसेल, गाव उठवलं जात नसेल तर फेरविचार करावा," असे अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com