Ajit Pawar Deputy CM Oath Ceremony : अजित पवारांचा नवा रेकॉर्ड; आत्तापर्यंत पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ...

Rashtrawadi MLAs Oath Ceremony : एकाच पंचवार्षिकमध्ये तीनवेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजितदादा हे पहिलेच नेते ठरले आहेत.
Ajit Pawar  Deputy CM Oath Ceremony
Ajit Pawar Deputy CM Oath Ceremony Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परत एकदा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे. आता राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास ४६ आमदारांसह अजित पवारांनी भाजप शिवसेना युती सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले आहेत. याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण याचवेळी अजित पवारांनी अनोखा विक्रम केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)नेते अजित पवार यांनी रविवारी (दि.२ जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवारांनी आज पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यात विशेष म्हणजे एकाच पंचवार्षिकमध्ये तीनवेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजितदादा हे पहिलेच नेते ठरले आहेत.

Ajit Pawar  Deputy CM Oath Ceremony
Sharad Pawar on Ajit Pawar: अजित पवारांची बैठक; प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चांवर शरद पवार स्पष्टचं बोलले...

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना अजित पवार(Ajit Pawar) यांनी सर्वप्रथम ११ नोव्हेंबर २०१० उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.यावेळी त्यांनी १ वर्ष ३१९ दिवस या पदावर राहिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. पवारांनी दुसऱ्यांदा पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखालील सरकारमध्ये ७ डिसेंबर २०१२ ला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी एकाच पंचवार्षिकमध्ये दोनवेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ ही 23 नोव्हेंबर 2019 घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वात तीन दिवसांसाठी अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांच्या गळ्यात पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडली. 30 डिसेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले. मागील वर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर ते राज्याचे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळत होते.

Ajit Pawar  Deputy CM Oath Ceremony
Sharad Pawar On Ajit Pawar : अजित पवारांसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर कारवाई करणार का..? शरद पवारांचं मोठं विधान

आता पुन्हा एकदा त्यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिवसेना युतीत सांभाळणार आहेत.

मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा २०१९ ला झालेल्या पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा चर्चेत आला होता. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात कलगीतुरा रंगला होता. या दोन्ही नेत्यांमध्ये सुरु असलेलं राजकारण तापलेलं असतानाच आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी उफाळून आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com