Ajit Pawar News: अजित पवारांचे दौरे रद्द, भाजपचे दोन नेते तातडीने दिल्लीला रवाना; नक्की चाललयं काय?

Maharashtra Political Crisis: या घटनाक्रमाचे वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात येत आहे.
Maharashtra Political Crisis:
Maharashtra Political Crisis:Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल प्रलंबित आहे. या निकालाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (१७ एप्रिल) त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, तर दुसरीकडे भाजपचे दोन मोठे नेते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दोन्हा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज त्यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सध्या बारामतीत आहेत. अजित पवार यांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Maharashtra Political Crisis:
Atique Ahmad Murder : कर्माची फळे, नववधूचा शाप खरा ठरला: काय घडलं होतं १८ वर्षांपुर्वी?

दरम्यान, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार भाजपसोबत जाऊ शकतात, असा धक्कादायक खुलासा केला होता. या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेबाबतही राउतांनी सांगितलं होतं. "कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबालाच टार्गेट केलं जातयं. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न. पण 'पक्ष' म्हणून आम्ही भाजपबरोबर जाणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. (Maharashtra Political Crisis)

Maharashtra Political Crisis:
Karnataka Election: महाराष्ट्र एकीकरण समिती १० वर्षांनंतर प्रथमच बेळगावातील ६ मतदारसंघात निवडणूक लढणार: पाच ठिकाणी उमेदवार जाहीर

संजय राऊत यांच्या दाव्यानंतर आता अजित पवार हेदेखील भाजपसोबत जाणार असल्याचा दावा काही माध्यमांमधून करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 35-40 आमदारही जातील, अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. या सर्व गदारोळात अजित पवार यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याने आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार हे तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राज्यात येत्या काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात, अशी चर्चा होऊ लागली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com