आले रे आले गद्दार आले... म्हणत विरोधकांची सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी

Monsoon Session 2022| 17 ते 25 ऑगस्टपर्यंत राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालणार आहे.
Monsoon Session 2022
Monsoon Session 2022

मुंबई : ठाकरे सरकारला हाकलून सत्तेत बसलेल्या बंडखोर आणि भाजप (BJP) नेते डोळ्यापुढे येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे पित्त खवळले आणि 'आला रे आला, गद्दार आले, ५० खोके, सगळे ओके'... अशा निषेधाच्या घोषणा देत राष्ट्रवादीसह शिवसेना (Shivsena) , काँग्रेसच्या आमदारांनी अधिवेशन भरण्याआधीच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच भिडले.

सरकारविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसलेले विरोधक आक्रमक झाले असतानाच शिंदे-फडणवीस हेही पायऱ्यांवर आले तेव्हा शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले. त्याचवेळी पायऱ्यांपुढे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत सत्ताधाऱ्यांनीही घोषणाबाजी केली. 'गद्दार' या शब्दाची 'अॅलर्जी' असलेल्या बंडखोरांना 'गद्दार' म्हणत राष्ट्रवदीच्या आमदारांनी त्यांच्या जखमेवर मीठच चोळले. त्यावरून आता सत्ताधारी विरोधकांत नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे स्पष्ट आहे.

Monsoon Session 2022
Ashish Shelar : मोदींचा फोटो दाखवून आदित्य ठाकरे हे निवडून आले ; शेलारांचा टोला

सत्तानाट्याने लांबलेले पावसाळी अधिवेशनाचा बुधवारपासून सुरू झाले. गेल्या दोन पावणे महिन्यांत राजकीय उलथापालथ होऊन ठाकरे सरकार कोसळले आणि महाविकास आघाडीला धक्का देत, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. सत्ता आणि त्यानंतरच्या अस्तित्त्वाच्या ईर्ण्येने पेटलेल्या शिवसेना अणि बंडखोरांत रोज धुमश्चक्री होत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनेही अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उडी घेतली.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी सरकारविरोधात सकाळी साडेदहाच्या सुमारास आंदोलन सुरू केले. त्यानंतर पावणेअकरा वाजता शिंदे, फडणवीस यांच्यासह मंत्री, आमदार हेही विधान भवनाच्या इमारतीतून आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे निघाले. तेव्हा आंदोलन करणारे विरोधक आणि सत्ताधारी गट पायऱ्यांवर एकत्र आले. त्याचवेळी '५० खोके, सगळे ओके'च्या घोषणा देत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले.

त्यावरच न थांबता विरोधकांनी विशेषतः राष्ट्रवादीच्या आमदारांनी थेट आले रे आले गद्दार आले,' असा उल्लेख करीत, राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंडखोरांना हिणवले. शिंदे-फडणवीस असल्याने बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादीला कोणतेही प्रत्युत्तर न देता पुन्हा विधान भवनाच्या इमारतीत निघून गेले. आवारातील जेमते काही पाच-सहा मिनिटांतच वातावरणाने सत्ताधारी विरोधकांतील संघर्ष शमणार नसल्याचे संकेत मिळाले. अधिवेशनानिमित्त सत्ताधारी-विरोधक पुढचे काही दिवस एकमेकांसमोर येणार राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्यातील संघर्षाचा भडका उडू शकतो, हे मात्र नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com