Ashish Shelar : मोदींचा फोटो दाखवून आदित्य ठाकरे हे निवडून आले ; शेलारांचा टोला

Ashish Shelar : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मतदारसंघात भाजपकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Aditya Thackeray, Ashish Shelar Latest News
Aditya Thackeray, Ashish Shelar Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिंदे सरकार (shinde government) स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यावहिल्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुख्यमंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता एकाच पक्षाचे मात्र,विरोधकांच्या भूमिकेत दिसत आहेत. या अधिवेशनाला शिंदे सरकार कसे सामोरे जाणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मतदारसंघात भाजपकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी येथे शिवसेना (Shivsena) आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) हे दहीहंडी उत्सव साजरा करत होते. मात्र यंदा भाजपने त्याच्या आधीच मैदान मिळवले असल्याने अहिरांची मात्र पंचाईत झाली आहे. यावरुन आता आदित्य ठाकरे आणि भाजपचा 'सामना' रंगला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव पार पडणार आहे. या माध्यमातून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले जात आहे. शेलारांनी आज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Aditya Thackeray, Ashish Shelar Latest News
Vinayak Mete : मेटेंच्या अपघाताला वेगळं वळण, चालक वाघमारे यांचा नवा खुलासा

"आदित्य ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दाखवून भाजपच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली. ही लाचारी नाही का? " असा सवाल शेलारांनी आदित्य ठाकरेंना केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, " राज्यात फक्त राजकारण सुरू, जनतेचा आवाज दाबला जातोय, घटनाबाह्य सरकार असल्याने जनतेचा आवाज ऐकू येत नाही. आम्ही घटनेचे सेवक आहोत, 40 गद्दारांकडे नैतिक अधिकार नाही. अपक्षांना स्थान दिले नाही, निष्ठेला बंडखोरांमध्ये स्थान नाही हे मंत्रिमंडळ विस्तारात दिसतयं. खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेचा लक्षात आले आहे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com