Rohini Khadse letter to President : जगभरात आज जागतिक महिला दिन (International Women's Day) मोठ्या उत्साहत साजरा केला जात आहे. महिलांच्या कार्याचा कौतुक करण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे. मात्र, दुसरीकडे राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत.
दररोज कुठे ना कुठे महिलांवर अत्याचार केल्याचं उघडकीस येत आहे. नुकतंच स्वारगेट बसस्थानकात झालेल्या अत्याचारामुळे राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. हे प्रकरण ताजं असातनाच दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
महिलांवर होत असलेल्या याच अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिला दिनाचे औचित्य साधत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी चक्क महिलांना एक खून करण्याची परवानगी द्यावी अशी विचित्र मागणी केली आहे.
रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, 'विषय एक खुन माफ करणेबाबत, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे, अहिंसेचे मोठे प्रतीक आहे. तरीही आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे.
त्याला कारणही तसेच आहे. आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत १२ वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.
राष्ट्रपती महोदया केवळ १२ वर्षीय, विचार करा काय परिस्थिती असेल? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी एका सर्व्हेचा दाखला देत भारतात महिला किती असुरक्षित आहेत याचा दाखला देखील दिला. त्यांनी लिहिलं की, नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आल्याच्या बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे.
त्यानुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे. त्यामुळे आम्हाला एक खुन माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो. आम्हाला खुन करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा.
महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे. आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू, असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे. सध्या त्यांनी केलेल्या मागणीची आणि पत्राची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.