Ambernath News: अंबरनाथमध्ये काँग्रेसला खिंडार; सात माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Ambernath Congress News: मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी प्रदीप पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले.
Ambernath Congress News:
Ambernath Congress News:Sarkarnama
Published on
Updated on

Dombivli Political News: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला अंबरनाथमध्ये मोठा धक्का बसला आहे. अंबरनाथ काँग्रेस जिल्हाअध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रदीप पाटील यांच्यासह सहा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे अंबरनाथमधील संपूर्ण काँग्रेस भुईसपाट झाले असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी प्रदीप पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया या वेळी प्रदीप पाटील यांनी दिली.

प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ, चरण रसाळ, माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, बबन तांबे, मनोज देवडे, बिस्मिल्ला शेख, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्मिता बंगेरा, नयना पवार, विद्या नागदिवे, अर्चना प्रसाद, मनीषा परमल, युथ काँग्रेसचे हर्षल भोईर, देवराज अल्झानडे, संकेत तांबे, आशिष डुबली ईशान जाधव, अश्फाक खान, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव, ज्ञानेश्वर शेलार, अनिल कांबळे, प्रशांत उतेकर हे प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ambernath Congress News:
PM Modi News: मोदींच्या गॅरंटीवर वातावरण टिकवून ठेवण्याचे महायुतीसमोर आव्हान

मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. आगामी काळात पूर्ण ताकदीने शिवसेनेचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया या वेळी प्रदीप पाटील यांनी दिली. प्रदीप पाटील हे 1995 पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक असून माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत.

अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एकहाती धुरा सांभाळली. मात्र, आता मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com