Shivsena MLA Disqualification : ठाकरे गटाचा नार्वेकरांना टोला; म्हणाले, 'कायद्याची मोडतोड कशी केली...'

Uddhav Thackeray Vs Rahul Narwekar : वेळापत्रकावर ठाकरे गटाचा आक्षेप, महिन्यात प्रक्रिया करण्याचे आवाहन
Anil Parab, Rahul Narwekar
Anil Parab, Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : शिवसेना आमदार अपात्रतेबाबतच्या प्रकरणाची सुनावणी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार १३ ते २३ ऑक्टोबरदरम्यान यावर युक्तिवाद होणार आहे. २३ नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यांमध्ये अंतिम सुनावणी होईल, तर अंतिम निकाल थेट डिसेंबरच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात येईल, असे बोलले जात आहे. या वेळापत्रकावर ठाकरे गटाच्या वतीने आक्षेप घेतला आहे, तर ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब यांनी आंतरराष्ट्रीय लोकशाहीवरील परिषदेवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना टोलाही लगावला आहे. (Latest Political News)

सत्तासंघर्षावरील निकाल देण्यात वेळकाढूपणा असल्याचा संशय परब यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, 'सर्वांचा गुन्हा सारखाच आहे. तसेच राज्यपालांनी केलेली कृती, मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, व्हिप मिळाला, ते सुरत-गुवाहटीला गेले. तेथे त्यांनी बैठका घेतल्या, हे सत्य सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे घडलेल्या या घटनाक्रमांवर पुन्हा एकदा सुनावणी घेण्याची गरज नाही. यातून केवळ वेळ काढण्याचाच खटाटोप सुरू असल्याचे वाटत आहे.'

Anil Parab, Rahul Narwekar
Pankaja Munde BJP : पंकजा मुंडेंच्या 'वैद्यनाथ'वरील वक्रदृष्टी भाजपला महागात पडणार?

२३ नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यांनी अंतिम सुनावणी होत असल्याचे अध्यक्ष सांगत असले तरी तसे होणार नसल्याचे परब यांनी सांगितले. ते म्हणाले, '२३ नोव्हेंबरनंतर हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या काळात ते काहीही काम करणार नाहीत. यानंतर ते एका आंतरराष्ट्रीय परिषदेला जाणार आहेत. या परिषदेत लोकशाहीवर चर्चा होणार आहे; मग तेथे आपण तेथे लोकशाहीवर कुठले मुद्दे मांडणार. महाराष्ट्रात कशी कायद्याची मोडतोड झाली, घटनेची कशी पायबंदी झाली, याचे तेथे प्रझेंटेशन करणार आहात का,' असा टोला परब यांनी लगावला.

सर्वांवर आरोप एकच आहेत. सर्वोच्च न्यायालयाने १६ लोकांची एकत्र सुनावणी घेतली. त्यामुळे खालच्या कोर्टाने त्यात वेळ का काढावा, जे 'अॅडमिट फॅक्ट' आहेत, त्यावर आणखी पुरावे का तपासावेत? (Maharashtra Political News)

सर्वोच्च न्यायालयाने दहा महिने ऐकल्यानंतरच १६ आमदारांचे प्रकरण अध्यक्षांकडे पाठवले. त्यानंतर आम्हीही तीन महिने काही बोललो नाही. या काळात अध्यक्षांनी काहीही कामकाज केले नाही. या दिरंगाईविरोधात याचिका दाखल केल्यानंतर हलचाली सुरू झाल्या. कुणावरही अन्याय होऊ नये, मात्र न्यायाला उशीर झाला तर न्याय नाकारल्यासारखेच असते, हे लक्षात घेऊन अध्यक्षांनी न्यायिक पद्धतीने न्यायनिवाडा करावा, असे आवाहनही परब यांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Anil Parab, Rahul Narwekar
Ajit Pawar Vs Gopichand Padalkar : 'सागर' बंगल्यावर अजितदादांची एन्ट्री अन् पडळकरांचा काढता पाय...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com