MNS Nashik Toll Plaza: मनसे कार्यकर्त्यांना तोडफोड भोवली; आठ जणांना अटक, फरारींचा शोध सुरू

Amit Thackeray Statement: अमित ठाकरेंचा उत्तर महाराष्ट्र दौरा ठरला वादग्रस्त
Sinnar Toll, Amit Thackeray
Sinnar Toll, Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik News : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा चांगलाच चर्चेत राहिला आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेला अमित यांनी थेट सरकारला जबाबदार धरत राज्यात खळबळ उडवून दिली. दरम्यान, जळगावहून अहमदनगरला येताना त्यांना सिन्नर टोलनाक्यावर अर्धा तास अडवून ठेवले. याची माहिती मिळताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. त्यातील आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून इतर फरार मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शोध सुरू आहे. एकंदरीत अमित ठाकरेंचा उत्तर महाराष्ट्र दौरा वादग्रस्त ठरल्याची चर्चा आहे. (Latest Political News)

Sinnar Toll, Amit Thackeray
Eknath Shinde News: पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री शिंदेंना भेटून निरोप दिला; 'या' खासदाराच्या दाव्याने खळबळ

समृद्धी महामार्गावरून अहमदनगरला येताना सिन्नर टोलनाक्यावर अमित यांची कार अडवून ठेवली होती. यानंतर विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. याबाबत टोल व्यवस्थापकाने वावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसेच्या १२ ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यातील आठ जणांना अटक करण्यात आली असून इतर फरारी झालेल्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सिन्नर टोलनाक्याची तोडफोड झाल्यानंतर अमित वडील राज ठाकरे यांच्या पवलावर पाऊट टाकत असल्याची चर्चा सुरू झाली. या टोलच्या तोडफोडीचे समर्थन करत अमित म्हणाले, राजसाहेबांमुळे राज्यातील ६० हून अधिक टोलनाके फुटले आहेत. आता माझ्यामुळे त्यात आणखी एका टोलनाक्याची भर पडली आहे." तत्पुर्वी ठाकरेंनी इर्शाळवाडी दुर्घटनेप्रकरणी सरकारवर निशाणा साधला होता. "सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त असल्यानेच इर्शाळवाडीकडे दुर्लक्ष झाले. यातूनच ही घटना घडल्याने अनेकाचा जीव गेला", असे अमित म्हणाले होते.

Sinnar Toll, Amit Thackeray
Chandrapur News : चंद्रपुरमध्ये गोळीबार ; भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू

सिन्नर टोलनाका तोडफोडप्रकरणी मनसेच्या पदाधिकऱ्यांवर अटकेची कारवाई केलेली आहे. त्यांच्या जामिन्यासाठी पक्षाच्या वतीने प्रयत्न केले जातील. मात्र राज ठाकरे यांनी सुरू केलेले टोलनाक्याविरोधातील आंदोलने यापुढे अमित ठाकरे सुरू ठेवण्याची शक्यता आहे. अमित सध्या राज्याच्या दौरा करत असून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. इर्शाळवाडीवरील प्रतिक्रिया आणि सिन्नर टोलनाका तोडफोडीनंतर यापुढे अमित ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com