Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde News: पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री शिंदेंना भेटून निरोप दिला; 'या' खासदाराच्या दाव्याने खळबळ

Thackeary Vs Shinde Group : ठाकरे-शिंदे गटात शाब्दिक चकमक
Published on

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटंबासह सदिच्छ भेट घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करूनही राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा काही केल्या थांबताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री शिंदे यांना निरोप समारंभासाठी बोलावल्याची बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. या टीकेनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक चकमक होणार असल्याचे दिसून येत आहे. (Latest Political News)

Eknath Shinde
Chandrapur News : चंद्रपुरमध्ये गोळीबार ; भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी २२ जुलै रोजी कुटुंबियांसह दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मोदींनी ट्विट करून शिंदेंचे कष्टाळू मुख्यमंत्री म्हणत कौतुक केले. मोदींच्या ट्विटनंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 'कष्ट टाळू' म्हणत जोरदार प्रहार केला. यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा नव्या संघर्षाला सुरूवात झाली आहे.

राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना ऊत आला असून खासदार संजय राऊत यांनी काही दिवसातच राज्याला नवे मुख्यमंत्री लाभलेले दिसतील असा दावा केला आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदेना 'टार्गेट' करत सावंत म्हणाले "पंतप्रधान मोदींनी शिंदे यांना कुटुंबासह बोलावून निरोप देऊन शुभेच्या दिल्या आहेत. निरोप संमारंभासाठीच त्यांना दिल्लीला बोलावले होते." ठाकरे गटाकडून झालेल्या बोचऱ्या टीकेला शिंदे गटाकडूनही जशास तसे उत्तर मिळण्याची शक्यता असून हा शाब्दिक वाद वाढणार आहे.

Eknath Shinde
MP Sunil Tatkare News: 'सरकारमध्ये सहभागी झालो तेव्हाच मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टता झाली'; तटकरेंनी सांगितली 'मन की बात'

मोदींनी शिंदेचे कौतुक केल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंना 'कष्ट टाळू मुख्यमंत्री' म्हणत जिव्हारी लागणारा बाण सोडत घायाळ केले होते. शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, "कष्ट टाळू मुख्यमंत्री ते 'कष्टाळू' मुख्यमंत्री…महाराष्ट्राचा बदलता राजकीय प्रवास!" अशा शब्दांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना चिमटा काढला होता. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री निवास्थान परिसरात भावी मुख्यंत्री म्हणून अजित पवार यांचे फलक लावण्यात आले आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com