Amit Thackeray News
Amit Thackeray News Sarkarnama

Amit Thackeray News : पुतळ्यांवर खर्च करण्यापेक्षा छत्रपतींचे गड-किल्ले... ; अमित ठाकरेंनी घेतली स्पष्ट भूमिका!

Lok Sabha Election 2024 : अमित ठाकरे म्हणाले, "हा इतिहास जपायला हवा, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा."
Published on

Mumbai News : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. जागावाटप आणि उमेदवारी याबाबत सर्वच पक्षांची लगबग सुरू आहे. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पारंपरिक गुढीपाडवा मेळावा येत्या 9 एप्रिल रोजी नियोजित आहे. यामुळे मनसेची आगामी लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट होईल. मात्र, त्याआधी राज ठाकरे यांचे पुत्र व मनसे नेते अमित ठाकरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि स्मारकांबाबत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची दुर्दशा झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. (Lok Sabha Election News)

Amit Thackeray News
Shahaji Patil On Raj Thackeray : राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून चालतील का? शहाजीबापूंनी एका वाक्यातच विषय संपवला

अमित ठाकरे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, "माफी राजं... महाराजांचे गड-किल्ले हे केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीत, तर पराक्रमाची आणि शौर्याची स्मारकं आहेत. पण आजची त्यांची दुर्दशा बघवत नाही. शासनाने हजारो कोटी रुपये नव्या पुतळ्यांवर खर्च करण्यापेक्षा, शिवछत्रपतींच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी खर्च करणं कितीतरी महत्त्वाचं आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"गड-किल्ल्यांचा आपला हा सुवर्ण इतिहास आजही आस धरून आहे. हा इतिहास जपायला हवा, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा, हे भान सरकारला यावे आणि हे ऐतिहासिक वैभव निरंतर जपले जावे, हीच अपेक्षा," अशी आशा त्यांना याबाबत व्यक्त केली.

अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले, "आज महाराजांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांना नमन करून शपथ घेऊया की स्वराज्यासाठीच्या त्यांच्या लढ्याच्या या ऐतिहासिक पाऊलखुणा जपण्यासाठीची आपली जबाबदारी आपण ओळखू. गड-किल्ल्यांच्या ऐतिहासिक पावित्र्याला आपल्या बेजबाबदार वर्तनाने कुठलाही धक्का लागणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घेऊ, अशी भूमिका अमित ठाकरे यांनी घेतली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com