Shahaji Patil On Raj Thackeray : राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून चालतील का? शहाजीबापूंनी एका वाक्यातच विषय संपवला

Uddhav Thackeray Vs BJP : राज्यात उद्धव ठाकरेंची पोकळी भरून काढण्यासाठी भाजप विविध मार्गांचा अवलंब करताना दिसत आहे. यातूनच आता उद्धव ठाकरेंना पर्याय राज ठाकरे उभे करण्याची भाजपने तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे.
Eknath Shinde, Shahaji Patil, Raj Thackeray
Eknath Shinde, Shahaji Patil, Raj ThackeraySarkarnama

Maharashtra Political News : मनसेला महायुतीत घेण्यासाठी राज ठाकरे यांनी दोनदा दिल्लीवारी केली आहे. त्यांना महायुतीत सामावून घेण्यासाठी घटक पक्षांचाही अडथळा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचे स्वागतच केले आहे. मात्र, राज यांच्यासोबत सुरू असलेली चर्चा फक्त लोकसभा निवडणुकीवर थांबली नाही, तर आगामी काळात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे या नात्याने राज ठाकरेंना दीर्घकाळासाठी आपल्यासोबत घेण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरेंना मनसे मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत विलीन करावी. तसेच त्या शिवसेनेचे प्रमुख म्हणून जबाबदारी घ्यावी, असा थेट प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळासह शिंदे गटातही खळबळ उडाली आहे. Shahaji Patil On Raj Thackeray

Eknath Shinde, Shahaji Patil, Raj Thackeray
Maharashtra Politics: कुणी नाराज, तर कुणी आज इकडे, उद्या तिकडे; सर्व पक्षप्रमुखांच्या डोक्याला ताप

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधील झालेल्या चर्चेसंबंधित एका इंग्रजी वृत्तपत्राने बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर राज्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी 2019 मध्ये युती तोडल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. आता राज्यात उद्धव ठाकरेंची पोकळी भरून काढण्यासाठी भाजप विविध मार्गांचा अवलंब करताना दिसत आहे. यातूनच आता उद्धव ठाकरेंना पर्याय राज ठाकरे उभे करण्याची भाजपने तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. या दृष्टीने दिल्लीत गेलेल्या राज यांच्यापुढे शिवसेनेत मनसे विलीन करून नव्या शिवसेनेचे नेतृत्व करण्याचा भाजपने प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.

Eknath Shinde, Shahaji Patil, Raj Thackeray
Vidarbha Politics : बच्चू कडूंना मोदी हवेत, पण नवनीत राणा नको...!

भाजपने या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच त्यांना शिवसेनेतील निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी, नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचीही सहमती मिळवण्यास सांगितले आहे. यासह लोकसभेचा निकाल काहीही आला तरी मुख्यमंत्री पदावर शिंदेंना कायम ठेवले जाईल, असा शब्दही शिंदेंना भाजपने दिल्याची माहिती आहे. भाजपच्या या प्रस्तावाला मात्र शिंदे गटातून जोरदार विरोध होऊ लागला आहे.

भाजपच्या या प्रस्तावाबाबत विचारले असता, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटलांनी (Shahaji Patil) नाराजी व्यक्त केली. पक्षसंघटनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खूप कष्ट घेतले आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदेच राहिले पाहिजेl. आता शिंदेंनी येऊन जरी तसे सांगितले तरी आम्ही त्यांना स्पष्टपणे नकार देऊ, असे पाटलांनी ठणकावून सांगितले आहे. शिंदे गटातील एका आमदाराने स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे भाजपची खेळी यशस्वी होते की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

दरम्यान, दिल्लीतील चर्चेबाबत मनसेच्या (MNS) नेत्यांनी उघडपणे बोलण्यास नकार दिला असला तरी राज यांना शिवसेनेच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव आल्याचे अनेक मनसे नेते सांगत आहेत. भाजपसोबत जोडले गेलो तर आनंदच आहे. त्यासाठी उभय नेत्यांमध्ये आणखी काही बैठका होतील. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची परवानगीही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे या प्रस्तावावर आत्ताच बोलणे घाईचे होईल, असे एका मनसे नेत्यांनी सांगितले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Eknath Shinde, Shahaji Patil, Raj Thackeray
Lok Sabha Election 2024 : वसुंधरा राजेंचा विश्वासू नेता देणार ओम बिर्लांना टक्कर; भाजपला धक्का

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com