काय ते मंत्री? काय त्यांचे नाव? काय त्यांचा दौरा? एकदम OK; सावंतांना मिटकरींनी डिवचले

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) आपल्या दौऱ्यावरुन चांगलेच अडचणीत आले आहे.
Tanaji Sawant, Amol Mitkari
Tanaji Sawant, Amol Mitkarisarkarnama
Published on
Updated on

Tanaji Sawant : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) आपल्या दौऱ्यावरुन चांगलेच अडचणीत आले आहे. त्याचा पुण्यातील तीन दिवसांचा दौरा जिल्हा माहिती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षांना कडाडून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

तानाजी सावंत हे पुण्यातील कात्रज भागातील त्यांच्या घरून निघून कात्रजमधीलच बालाजी नगरमधील त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात जाणार आहेत. तिथून पुन्हा त्यांच्या घरी परतणार आहेत, एवढा प्रवास ते करणार आहेत. सावंत यांच्या कात्रज मधील घरापासून त्यांच्या उद्योग समूहाचे कार्यालय अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. मात्र, तीन दिवसांत मंत्री घर ते उद्योग समूहाचे कार्यालय आणि पुन्हा घर असा प्रवास करणार आहेत. घर ते ऑफिस व ऑफिस ते घर, असा हा दौरा आखण्यात आल्यामुळे त्यांचा हा दौरा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरुन अमोल मिटकीर यांनी सावंत यांना टोला लगावला आहे.

Tanaji Sawant, Amol Mitkari
कर्जत-जामखेडमधील रस्त्याच्या कामात अपहाराचा आरोप : चार सदस्यीय समिती चौकशी करणार

अमोल मिटकरी यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यामध्ये मिटकरी म्हणाले, ''हे आहेत आमचे आरोग्य मंत्री! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम!! " काय ते मंत्री ? काय त्यांचे नाव? आणि काय त्यांचा दौरा?? एकदम OKK OKK'' असे म्हणत त्यांनी सावंत यांना डिवचले आहे.

दरम्यान, मंत्र्यांचा दौरा जाहीर झाला की त्यांचा विविध ठिकाणचा आढावा असतो. काही बैठका असतात महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी गाठी असतात. पत्रकार परिषदा, किंवा सभा असतात. नवनिर्वाचीत आरोग्य मंत्री असलेल्या तानाजी सावंतांच्या दौऱ्यात कोणत्याही बैठका, सभा किंवा पत्रकार परिषद नसल्याने आणि या प्रवासादरम्यान पोलीसांचा कॉनव्हॉय तैनात असल्याने या दौऱ्यावरु त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

Tanaji Sawant, Amol Mitkari
Shivsena : कॅबिनेट मंत्री झालेल्या भुमरेंच्या मतदारसंघातील कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या

त्यांच्या या दौऱ्याची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये तानाजी सावंत यांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे. बंडापासून सावंत हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेले आहे. कोण ते आदित्य ठाकरे? असेही ते म्हणाले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात पालघरच्या आरोग्य यंत्रणेबद्दल विरोधकांकडून त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावरुन देखील ते चर्चेत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com