मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील सामना जोरदार रंगला आहे. त्यात आता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. सोमवारी एक ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. (Amruta Fadnavis Latest Marathi News)
बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून ठाकरे यांनी शनिवारी फडणवीसांना टोला लगावला होता. फडणवीसांनी बाबरीवर पाय ठेवला असता तरी ती पडली असती, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्याला फडणवीस यांनी रविवारच्या उत्तर सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलं. या आरोप-प्रत्यारोपांनी राज्यातील राजकारण रंगलं आहे.
फडणवीसांच्या रविवारच्या भाषणानंतर अमृता फडणवीस यांनी सोमवारी सूचक ट्विट केलं. त्यामध्ये त्यांनी कुणाचेही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा थेट रोख मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे स्पष्ट होते. त्यांनी हिंदीतून ट्विट केलं असून त्यात म्हटले आहे की, 'वजनदार व्यक्तीने (देवेंद्र फडणवीस) हलक्या व्यक्तीला (उद्धव ठाकरे) हलक्या वजनाने काल आणखी हलके केले.'
देवेंद्र फडणवीस यांनी असं दिलं प्रत्युत्तर
कारसेवकांची थट्टा उडविणाऱ्यांना माझे स्पष्ट सांगणे आहे. देशाची धर्मसंस्कृती जपण्यासाठी आम्ही वारंवार असे जात राहू. त्यांनी माझ्या वजनामुळे बाबरी पडली, असे म्हटले. केवढा विश्वास आहे माझ्यावर आहे, ते बघा. माझे वजन आजचे वजन 102 आहे आणि बाबरी मशीद पडण्याच्या वेळी ते वजन 128 किलो होते. उद्धव ठाकरेंना समजावे म्हणून त्यांच्या भाषेत सांगतो. सामान्य माणसाचा एफएसआय एक असेल तर माझा 1.5 आहे आणि बाबरी पाडायाला गेलो तेव्हा तो 2.5 होता, अशा भाषेत फडणवीसांनी उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले, आज मी मुख्यमंत्र्यांच्या सभेला उत्तर देणार आहे. `कल की सभा मास्टर सभा नही, लाफ्टर सभा थी`, अशी हिंदीतून सुरूवात करतांनाच कल छत्रपती संभाजी महाराज, भगवान नृसिंह भगवान की जंयती थी. एक धर्म के लिये मिटनेवाले तो दुसरे पापीयो के पेट को फाड देणेवाले. इसलिये तेजस्वी, ओजस्वी सुनने को मिलेगा एसा लगा था. लेकीन आखीर तर लाफ्टर शो खतमही नही हुआ, असा टोला फडणवीसांनी लगावला.
ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवतांना फडणवीसांनी उपस्थितांना कोविड काळात मुंबईत भ्रष्टाचार झाला की नाही? दीड लाख लोक मरण पावले की नाही? मनसुख हिरेन, शंभर कोटींची वसुली झाली की नाही? कोरोना काळात मजुरांना मुंबई सोडावी लागली की नाही? दाऊदशी संबंध असणारा मंत्री मंत्रीमंडळात आहे की नाही, असे सवाल देखील फडणवीसांनी उपस्थितांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.