Maharashtra Budget : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन देण्याची घोषणा

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पामध्ये काय महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या?
Maharashtra Budget 2023
Maharashtra Budget 2023Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा अर्थसंकल्प साजर केला. या अर्थसंकल्पादरम्यान, अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.

आता ज्या शेतकऱ्यांना शेततळे आणि ठिबक सिंचन हवे आहे त्यांना ते देण्यात येणार आहे. यासाठी मागेल त्याला शेततळे आणि ठिबक सिंचन देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.

Maharashtra Budget 2023
Uday Samant News: उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले एअरबस आणि वेदांता महाराष्ट्राबाहेर जाण्याचे कारण !

याबरोबरच राज्य सरकार आता केंद्र सरकार प्रमाणे शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये देते. त्या पार्श्वभूमीवरच आता राज्य सरकारही शेतकऱ्यांना पैसे देणार आहे.

पीएम किसान अंतर्गत, पात्र शेतकरी कुटुंबांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पीएम किसान अंतर्गत ही आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. तर याच पद्धतीने राज्य सरकार आता तीन समान हप्त्यांमध्ये वर्षाला सहा हजार रूपये शेतकऱ्यांना देणार आहे.

Maharashtra Budget 2023
Shankarao Gadakh News : नगरमधील राजकारण तापलं; अखेर माजी मंत्री गडाखांच्या ताब्यातील दुध संघ बंदचा निर्णय

दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. असे असतानाच राज्य सरकारच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com