Mumbai Politics : मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. आव्हांड यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या भाजप महिला पदाधिकारी रिदा राशिद यांच्याविरोधात एका तरुणाने अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे. दलित असल्याने आपल्याला मंदीरात प्रवेश करु दिला नसल्याची तक्रार तरुणाने केली आहे. शिवा जगताप असे या तरुणाचे नाव आहे. या सर्व प्रकारामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज सकाळपासूनच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप भाजपच्या महिला पदाधिकारी रिदा राशिद यांनी केल्याने पुन्हा भाजप-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली आहे. आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.
शिवा भिष्माचार्य जगताप यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. "छटपूजेच्या दिवशी मुंब्र्यातील मुंब्रेश्वर मंदिर परिसरात तलावाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. माझ्यासोबत माझे मित्रंही होते. त्यावेळी रिदा रशिदा, सिंदर मुमताज अहमद आणि इतर दोन तीन महिला तिथे उभ्या होत्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करून मला धक्काबुक्की केली, असं जगताप यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
तसेच सिकंदर याने 'तुझे हातपाय तोडून फेकून देईल' अशी धमकी यावेळी दिली. रिदा रशीद यांनी तिथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांना व मंदिरातील व्यवस्थापकांना या दलित लोकांना मंदिरा बाहेर हाकलून देण्यास सांगितले आणि 'यांचे येथे काय काम आहे' असे बोलून जाती वाचक शिव्या दिल्या.
"मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नव्या पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी देखील रिदा रशिद, सिंकदर मुमताज, अहमद खान यांनी मला कार्यक्रमात पाहिले आणि जाणूनबुजून माझ्या बाजूला येऊन उभे राहिल्या. यावेळी हे सगळे लोक माझ्याकडे रागाने बघत होते. तसेच मला छटपूजेच्या दिवशीच्या प्रकरणावरून जातीवाचक शिवीगाळ देण्यास सुरुवात केली, असा आरोपही या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून रशिदा यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माझा सगळ्यांसमोर अपमान केला, मला हाताला धरून धक्काबुक्की केली, तुम्ही इथे काय करत आहात, मी महिला आहे, अशा प्रकारे महिलेचा जाहीर अपमान केला जात आहे, पोलीस प्रशासनाने यावर कारवाई करावी अशी विनंती केली आहे. असे रिदा रशीद यांना म्हणले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.