Dombivli Politics : आज राज्यभरात हिंदू धर्मिय आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) व मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदचा (Bakri Eid) उत्सव एकाच दिवशी साजरा केला जात आहे. कल्याणमधील (Kalyan News) दुर्गाडी किल्ल्याजवळ मात्र काहीसे तणावाचे वातावरण पहायला मिळाले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही शिवसेनेकडून दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यंदा शिवसेना शिंदे व ठाकरे गटात विभागली गेली असली तरी गेल्या 37 वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनासाठी दोन्ही गट एकत्र आल्याचे दिसून आले. आंदोलन दरम्यान काही शिवसैनिकांनी बॅरिकेट्स ओलांडून किल्ल्यात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून आलं. (Latest Marathi News)
बकरी ईदच्या दिवशी हिंदू भाविकांना दुर्गादेवीच्या दर्शनास प्रतिबंध केला जातो. त्याच्या निषेधार्थ तसेच हिंदूंनाही देवीच्या दर्शनास प्रवेश दिला जावा, या मागणीसाठी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने १९८६ सालापासून दिवंगत आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले होते.
गुरुवारी आषाढी एकादशी व बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्याजवळ शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला होता. गुरुवारी सकाळीच शिंदे गट व ठाकरे गटाचे कार्यकर्ते दुर्गाडी किल्ल्याच्या बाहेर जमून आंदोलन करू लागले. किल्ल्याच्या पायथ्याशी घंटानाद करत देवीची आरती कार्यकर्त्यांनी केली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी आधीच सतर्कतेचा उपाय म्हणून दुर्गाडी किल्ला परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. बॅरिकेट्स लावून किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे शिवसैनिकांनी किल्ल्याच्या बाहेरच घंटानाद आंदोलन केले.
आंदोलनाचा 37 वर्षांचा इतिहास -
दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही धर्मीयांची प्रार्थनास्थळे आहेत. बकरी इदच्या दिवशी या ठिकाणी मुस्लीम धर्मीय मोठ्या प्रमाणावर प्रार्थना करण्यासाठी जमतात. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या काळात किल्ल्यावर इतरांना प्रवेश बंद ठेवण्यात आला. 1986 साली धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाच्या शिवसेनेने किल्ल्याच्या बाहेर घंटानाद आंदोलन सुरू केलं. तेव्हापासून दरवर्षी किल्ल्याच्या परिसरात हे आंदोलन शिवसेनेकडून केलं जातं.
यावेळी शिवसेनेत फूट पडून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाल्यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते किल्ल्याच्या परिसरात जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे. या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करतानाच पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी काही आक्रमक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
यासंदर्भात बोलताना शिंदे गटाचे नेते गोपाळ लांडगे म्हणाले, "हिंदूंवर हा जो अन्याय होतोय, तो अन्याय दूर करण्यासाठी आनंदी दिघे यांनी सुरू केलेले आंदोलन आम्ही सातत्याने सुरू ठेवले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKnath Shinde) यांचा यात सहभाग आहे. त्यांना हा विषय माहीत आहे. ते हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. न्यायालयीन लढाई सुरू असल्यामुळे याला वेळ लागत आहे, मात्र आम्ही हिंदू हे सहन करणार नाही. आंदोलनाच्या माध्यमातून आमचा लढा सुरूच राहील."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.