Anant Geete News : 'मतदाररूपी भीम महाराष्ट्रातील 'या' बकासुराचा नाश करणार', अनंत गीतेंनी उल्हासनगरातून डागली तोफ!

Anant Geetes criticism of Mahayuti government : 'सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींना दीड हजार दिले. पण त्याबदल्यात..' असंही अनंत गीते यांनी म्हटलं आहे.
Anant Geete
Anant Geete sarkarnama
Published on
Updated on

Vidhansabha Election 2024 News : पक्षांची फोडाफोडी करून काका -पुतण्यात,भावा भावात भांडण लावलीत असे लाजेलाही लाज वाटेल इतकं नीच आणि खालच्या दर्जाचे राजकारण राजकर्त्यांनी केलं आहे.असा हल्लाबोल करतानाच महाराष्ट्रात देवेंद्र नावाच्या बकासुराने पुन्हा जन्म घेतला असून 20 नोव्हेंबरला मतदाररूपी भीम या बकासुराचा नाश करणार अशी तोफ शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे नेते, माजीकेंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी उल्हासनगरात डागली.

महाविकास आघाडीतील(MVA) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण पूर्वचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ मराठा सेक्शन मध्यवर्ती शिवसेना शाखेसमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी अनंत गीते बोलत होते.

य पूर्वी शूरांचा, विचारवंतांचा, गुणवंतांचा, साधुसंतांचा अशी महाराष्ट्राची ओळख होती.पण कालचा महाराष्ट्र आता राहिला नाही. मी पुन्हा येईन पण सत्ता आली नाही. मात्र सत्तेत येण्यासाठी पक्ष फोडले.अद्यापही बकासुराचे पोट भरले नसून अद्यापही पळवापळवी सुरू आहे. ही चिढ मनात असेल तर पेटून उठा आणि जिथेजिथे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करून निवडून आणण्याचे आवाहनही अनंत गीते(Anant Geete) यांनी केले. यावेळी त्यांनी भीम आणि बकासुराच्या युद्धाची कहाणी सांगितली. कल्याण पूर्वेत भीमाच्या रुपात धनंजय बोडारे उभे असून त्यांना निवडून आणा असेही ते म्हणाले.

Anant Geete
Mumbai Politics : डोंबिवलीच्या मोठागावचं वजन वाढणार? गावतले तीन शिलेदार वेगवेगळ्या मतदारसंघात आजमावताय नशीब

दृष्टशक्तीला गाडायच आहे. नशाखोरी, गुंडगिरी, दहशदीचे साम्राज्य संपवायचे आहे. श्रीमलंग गड परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन रोजगार उपलब्ध करून घ्यायचा आहे आणि पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपुष्टात आणायची असून त्यासाठी मशालीचेच बटण दाबण्याची हाक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Shivsena) उमेदवार धनंजय बोडारे यांनी दिली.

सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींना दीड हजार दिले. पण त्याबदल्यात सर्व वस्तू महाग करून ते पंधरा हजार रुपये वसूल करतात याची जाणीव तुम्हाला आहे की नाही? असा प्रश्न उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी महिलांना विचारला.

Anant Geete
Shivsena News : CM शिंदेंना काळे झेंडे दाखवणाऱ्या 'त्या' कार्यकर्त्याचं ठाकरेंनी थेट मातोश्रीवर बोलावून केलं कौतुक

2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय बोडारे आणि मी स्वतः राष्ट्रवादी कडून निवडणुकीला उभा होतो.त्यावेळेस बोडारे यांना 48 हजाराच्या वर मला 16 हजार सातशे मते पडली होती.आता आम्ही एकत्र असून आमच्या दोघांची मते एकत्र केलीत तर धनंजय बोडारे हमखास निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रकाश तरे यांनी व्यक्त केला.

जेष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर,माजी शहरप्रमुख सुरेंद्र सावंत यांचीही भाषणे यावेळी झाली.याप्रसंगी उपनेते तथा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू,शहरप्रमुख कैलास तेजी,युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी भाऊ म्हात्रे,महिला संघटिका जया तेजी,विधानसभा संघटक मंगला पाटील,उपशहरप्रमुख शेखर यादव,राजू माने,युवतीसेना कल्याण जिल्हा अधिकारी तेजस्वी पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com