मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty),बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty)आणि आई सुनंदा शेट्टी (Sunanda Shetty)यांना अंधेरीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले आहे. यासह न्यायालयाने तिघींनाही 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
- काय आहे हे प्रकरण
शिल्पा शेट्टीचे वडील सुरेंद्र शेट्टी एका ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाकडून ( M/s Y&A Legal)21 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ते जानेवारी 2016 मध्ये व्याजासह द्यायचे होते, असा दावा संबंधित एजन्सीच्या मालकाने केला आहे. मात्र कर्ज फेडण्याआधीच 11 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांचा मृत्यू झाला. सुरेंद्र शेट्टी यांनी आपल्या मुली आणि पत्नीला कर्जाबाबत सांगितले होते, असा दावा तक्रारदाराने केला आहे.
मात्र, सुरेंद्र कर्ज फेडण्याआधीच 11 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांचा मृत्यू झाला.आणि त्यानंतर शिल्पा, शमिता आणि त्याच्या आईने कर्ज फेडण्यास नकार दिला. तक्रारीनुसार, शिल्पा शेट्टी, बहीण शमिता आणि आई सुनंदा यांना त्यांच्या वडिलांनी 2015 मध्ये घेतलेले कर्ज फेडता आले नाही. सुरेंद्र शेट्टी यांनी वार्षिक 18 टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. या तिघीना 21 लाखांच्या कर्जाबाबत माहित असतानाही त्यांनी हे कर्ज फेडले नसल्याचा आरोप व्यावसायिकाने केला आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने शिल्पा, शमिता आणि त्यांची आई सुनंदा शेट्टी यांना 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.