
Anil Deshmukh
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणात आता अंमलबजावणी संचलनालयाने (Directorate of Enforcement) पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. अनिल देशमुख यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये फेरफार आणि ढवळाढवळ यासंबंधीचाही गुन्हा आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी ईडीकडून अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.
या पूर्वी ईडीने राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना समन्स बजावत चौकशीला बोलावले होते. काही दिवसांपूर्वी सिताराम कुंटेही (Sitaram Kunte) चौकशीला जाऊन आले. या प्रकरणात आज ईडीने पुणे वाहतूक पोलिसांचे डीसीपी राहुल श्रीरामे यांची चौकशी केली. ईडीने त्यांना गुरुवारी हजर राहण्याचे समन्स पाठवले होते, त्यानंतर राहुल श्रीरामे (Rahul Shrirame) यांनी गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर डीसीपी राहुलकडून सुमारे 7 तास चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.
आज ईडीने अकोला एसपी जी.श्रीधर यांना चौकशीसाठी समन्स बजावले असून त्यांना आज 11 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. काळात आणखी काही डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाऊ शकते. याच प्रकरणात अकोल्यातील पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनाही समन्स बजावलं आहे. तर 7 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे यांनाही इडीने समन्स बजावल्यानंतर ईडीसमोर हजर झाले होते. 30 नोव्हेंबरला राज्याचे माजी मुख्य सचिव या पदावरून ते निवृत्त झाले.
तर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांचाही ईडीने या प्रकरणी जबाब नोंदवला होता. यांच्याशिवाय डेप्युटी आरटीओ बजरंग खरमाटे आणि उपसचिव कैलास गायकवाड यांचेही इडीने जबाबही नोंदवले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.