Anil Deshmukh News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तब्बल १३ महिन्यानंतर जेलबाहेर आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली. तर यावेळी आर्थर रोड जेलबाहेर मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अनिल देशमुख हे तब्बल १३ महिन्यानंतर जेलबाहेर येताच त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. देशमुख म्हणाले, ''मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलं. परमबीर सिंग यांनी माझ्यावर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप केले. त्यांची चांदीवाल आयोगाकडे प्रतीज्ञापत्र सादर करताना म्हटलं, मी अनिल देशमुखांवर जे आरोप केले, ते ऐकीव माहितीवर होते, माझ्याकडे याबाबत पुरावे नाहीत. पण माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी मला न्याय दिला''.
''पण खोट्या गुन्ह्यात मला तुरुंगात राहावे लागले याचे दुःख आहे'', अशी खंत देशमुख यांनी व्यक्त केली. ''तर या सर्व प्रकरणादरम्यान राष्ट्रवादी माझ्या पाठिशी खंबीर उभा राहिली. त्यामुळे त्या सर्वांचे आभार''. असं म्हणत त्यांनी आपल्यावरील करण्यात आलेले आरोप फेटाळले.
अनिल देशमुखांवर नेमकं काय आरोप होते?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर तब्बल 100 कोटी वसूलीचा आरोप केला होता. या आरोपानंतर ईडीने त्यांना २ नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती. याप्रकरणात उच्च न्यायालयानेही सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या दोन्ही यंत्रणांनी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. त्यानंतर आता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याने ते तब्बल १३ महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.