Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. आझाद मैदान सोडून आंदोलक मुंबईच्या इतर भागात आहेत. सीएसएमटी परिसरात आंदोलकांमुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, कोर्टाने निर्णय देताना दक्षिण मुंबईतील मराठा आंदोलकांना तेथून हटवण्याचे निर्देश सरकारला दिले होते. तसेच नवीन आंदोलकांना मुंबईत येण्यासही बंदी घातली आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारवर टीका करत कोर्टाच्या निर्णयावर ट्विटवर प्रश्न विचारला आहे.
अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, कोर्टाला एकाच प्रश्न सरकारने ४ महिने काहीच का केले नाही, असे सरकारला का विचारले जात नाही? मराठ्यांना मुंबईपर्यंत यायला का भाग पाडले? दोन वर्ष झोपलं होते का सरकार ?'
स्वतःच्या समाजाचं इतकं मोठं आंदोलन चालू असताना शिंदे गावी का गेले? त्यांनी छत्रपतींसमोर आश्वासन दिलं होतं ना? अजित पवारांचे आमदार आंदोलनाला पाठिंबा देतात, पण अजित पवार एकही शब्द का बोलत नाहीत? हे दोघंही मराठा आहेत ना ? असा सवाल देखील अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
कोर्टात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद करताना या आंदोलनाला शरद पवार, उद्धव ठाकरे हे रसद पुरवत असल्याचे म्हटले तसेच मुख्यमंत्री ब्राम्हण असल्याने त्यांना टार्गेट केले जात असल्याचे म्हटले. दरम्यान, अंजली दमानिया यांनी 'संताप होतोय त्या सदावर्तेंचा युक्तिवाद ऐकून.', असे देखील म्हटले आहे.
२९ ऑगस्ट २०२३ पासून जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण ह्या विषयावर आंदोलन सुरू केले. ह्यात ८ वेळा उपोषणं , आंदोलने केली. आज त्या आंदोलनाचा उद्रेक झाला तर सरकारला नवल का वाटलं? किती वर्ष भिका मागायला लावणार? २०२३ पासून ते आत्तापर्यंत फक्त आश्वासने देऊन सरकारने वेळकाढूपणा का केला? समितीची बैठक घेतल्याचे आत्ता दाखवत आहेत, ह्या समितीच्या किती बैठका ह्या २ वर्षात झाल्या? ह्याचा अहवाल सरकार देऊ शकेल का? का फक्त झुलवत ठेवणार? असे देखील दमानिया यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.