आण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा; आग्रही मागणी घेवून रामदास आठवले घेणार PM मोदींची भेट

Ramdas Athawale : बौद्ध आणि मातंग समाजाने एकत्र यावे,असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.. 
Central Minester Ramdas Athawale & PM Narendra Modi Latest News
Central Minester Ramdas Athawale & PM Narendra Modi Latest News Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी बौद्ध आणि मातंग समाजाने एकत्र यावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे. ते अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदन येथील सभागृहात  जनकल्याण समिती तर्फे समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.  (Central Minester Ramdas Athawale & PM Narendra Modi Latest News)

Central Minester Ramdas Athawale & PM Narendra Modi Latest News
त्यांचं नाव मी घेणार नाही, नाहीतर ते माझं वय काढतील; आदित्य ठाकरेंचा केसरकरांना टोला...

रामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी बौद्ध आणि मातंग समाजाने एकत्र यायला हवे. अण्णाभाऊंचा मरणोत्तर  भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा या मागणीसाठी आपण गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची मी भेट घेतली होती. आता या मागणीसाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे. यावेळी रिपाईचे माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, महाराष्ट्र अध्यक्ष भुपेश थुलकर माजी आमदार राम गुड्डील्ले, केदारनाथ मंदिराचे पुजारी डॉ शिवलिंग शिवाचार्य, व्ही.व्ही सदामते, मधुकर सोनवणे, दिलीप सोळसे, शारदा डोलारे, विनोद जाधव, धनंजय सोळसे, गंगाधर हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आठवले यांच्या हस्ते सर्जेराव जाधव यांसह विविध मान्यवरांचा  समाज भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

Central Minester Ramdas Athawale & PM Narendra Modi Latest News
ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना संपत असल्याचे नड्डांचे विधान... : फडणवीसांचे स्पष्टीकरण

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना शाळेत जाऊन शिक्षण घेता आले नाही. मात्र त्यांच्या ठायी असणाऱ्या उपजत ज्ञान आणि लेखन प्रतिभेमुळे ते जागतिक दर्जाचे साहित्यसम्राट ठरले. त्यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास होता. त्यामुळे आंबेडकरी चळवळ मोठी व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव. ही अजरामर कविता लोकशाहीरांनी लिहिली तीच प्रेरणा घेऊन बौद्ध आणि मातंग समाजाने एकत्र यावे, असे आवाहन आठवलेंनी केले.

Central Minester Ramdas Athawale & PM Narendra Modi Latest News
जनतेच्या डोळ्यात अश्रू होते, तेव्हा हे ४० गद्दार निर्लज्जपणे टेबलावर नाचत होते...

ते पुढे म्हणाले की, मातंग समाज आता खूप जागृत झाला आहे. लढाऊ आहे. चळवळ करत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती मोठया प्रमाणात साजरी होत असून अनेक ठिकाणी अण्णाभाऊंचे पुतळे उभे राहत आहेत, असे आठवले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com