Thackeray vs Shinde Group : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक, युवा सेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. दरम्यान, घोलेंसोबत वडाळा विधानसभेतील ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक ठाकरे गटाचे शिवबंधन सोडून शिंदेंना पाठींबा देणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अमेय घोले (Amey Ghole) यांनी आपल्या विविध उपक्रमाच्या बॅनरवर पक्षाच्या नेत्यांची नावे आणि चिन्ह छापणे बंद केले होते. मागील अनेक दिवसांपासून अमेय घोले हे ठाकरे गटात नाराज होते. आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांच्या जवळच्या व्यक्तींच्या वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपाला ते कंटाळले होते.
याबाबत त्यांनी वारंवार आदित्य ठाकरे यांना कळविले होते. मात्र त्यानतंरही काही पावले उचलली गेली नसल्याचा आरोप घोले यांनी ट्विटमध्ये केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Shivsena पक्ष सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान आज रात्री साडेनऊ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश झाला आहे.
या पक्ष प्रवेशाची कुणकुण मातोश्रीला लागल्यानंतर वडाळा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आज सेनाभवनला बोलवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार (State Government) स्थापन झाले. त्यानंतर ठाकरे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे यांच्या जवळचे अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले आहे. दरम्यान, माजी मंत्री अनिल देसाई यांचा मुलानेही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.