ठाकरे गटाचा आणखी एक नेता शिंदे गटाच्या वाटेवर? आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट...

Uddhav Thackeray| Eknath Shinde| शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेचे दोन गट एकत्र करण्याचा माझा प्रयत्न आहे, असंही त्यांनी सांगितलं होते
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद आज (९ नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानी म्हणजेच 'वर्षा' वर निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दिपाली सय्यद यांची भेट होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर, जुलै महिन्यातही त्यांनी त्यांची भेट घेतली होती. शिवसेनेचे दोन गट एकत्र करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी मी शिंदेंना भेटायला चालले असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण गेल्या काही दिवसांपासून दिपाली सय्यद नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दिपाली सय्यद ठाकरे गटात की शिंदे गटात यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले होते. यावर लवकरच भूमिका स्पष्ट करेन, असंही त्यांनी सांगितलं होतं. शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्या आज त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray
BMC : शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात शिवसेना पुन्हा न्यायालयात!

शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. अंधारे यांनी तीन महिन्यातच पक्षात आपलं वेगळ स्थान निर्माण केल. पण तेव्हापासून दीपाली सय्यद या नाराज असल्याचं बोललं जात आहे. इतकचं नाही तर त्यांनी अनेकदा नाव न घेता सुषमा अंधारे यांना टोलाही लगावला आहे.

माध्यमांशी सय्यद म्हणाल्या होत्या की, शिवसेनेत काम करताना मला आता साडेतीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या, तरच तुम्ही राजकारणात सक्रिय आहात असा समज करण्याची गरज नाही. जे लोक कामं करतात त्यांनाच लोक पाठिंबा देतात. असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला होता.

प्रत्येकाला आपापली मतं मांडण्याचा अधिकार असतो, प्रत्येकानं आपला गट निर्माण केलाय. आता मी पण माझा गट निर्माण करणार. शिंदे गटातील प्रवेशाबाबत ही आपण ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळं आता त्या लवकरच ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं.

एकीकडे दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा असताना दुसरीकडे दिवाळीमध्ये त्या तिसऱ्याच वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दिपाली सय्यद यांनी दिवाळीत आपल्या घरासमोर कमळाची रांगोळी रेखाटली होती. तेव्हापासून त्या शिंदे गटाऐवजी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चाही सुरु होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com