Politics : महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?; केजरीवालांनी दिले स्पष्ट संकेत

Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray : ''उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरलं गेलं, पण...''
Politics : महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?; केजरीवालांनी दिले स्पष्ट संकेत
Published on
Updated on

Maharashtra Politics : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन घेट घेतली.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, ''देशात एक पक्ष आहे जो 24 तास निवडणुकीबाबत विचार करतो. आम्ही लोकांच्या प्रश्चांचा विचार करत असतो. यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यापासून शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न सोडवणं हे आमचे कर्तव्य आहे'', असं ते म्हणाले.

केजरीवाल पुढे म्हणाले, ''आम्ही देशातील परिस्थितीवर चर्चा केली. सध्या महागाई वाढत आहे. सर्वसामान्यांची कमाई वाढत नाही, पण खर्च वाढत आहे. दुसरीकडे केंद्र सरकार काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे''.

''उद्धव ठाकरे यांना खूप दिवसांपासून भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही त्यांना भेटलो. या नात्याला आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि पुन्हा-पुन्हा भेटत राहू'', असं म्हणत केजरीवालांनी आगामी काळात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीच्या युतीचे संकेतही दिले.

Politics : महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?; केजरीवालांनी दिले स्पष्ट संकेत
Kasba By-Election : रासनेंचा पराभव निश्चित : पण तो कमी मतांनी व्हावा यासाठी मुख्यमंत्री प्रचारात ; धंगेकरांचा मिश्किल टोला!

''उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरलं गेलं आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय देईल अशी अपेक्षा आहे. सध्या काही लोक धार्मिक विद्वेषाचे राजकारण सातत्याने करत आहेत'', असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

''बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते आणि उद्धव ठाकरे हे त्या वाघाचा पोरगा आहे. सगळा महाराष्ट्र त्यांच्या सोबतीला आहे. तेसच सर्वोच्च न्यायालय देखील त्यांना न्याय देईल. यापुढे महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक विजयी होतील'', अशा शुभेच्छा केजरीवाल यांनी ठाकरेंना यावेळी दिल्या.

Politics : महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?; केजरीवालांनी दिले स्पष्ट संकेत
Sambhajinagar : 'औरंगाबादचं नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' करू शकलो, याचा अभिमान' : ठाकरेंनी घेतले श्रेय !

''आगामी निवडणुकीत ठाकरेंशी युती करण्याबाबत केजरीवाल म्हणाले, ''निवडणुका लागल्या की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. कोरोना काळात उद्धव ठाकरेंच्या सरकारने चांगले काम केले. दिल्लीने देखील कोरोना काळात मुंबई मॉडेल स्वीकारलं. हे सांगायला कोणताच संकोच मला वाटत नाही'', असं म्हणत केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

Politics : महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?; केजरीवालांनी दिले स्पष्ट संकेत
Chinchwad By-Election : लोकसभेसोबतच विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका लागतील : अजितदादांचा अंदाज!

दरम्यान, शेवटी सत्याची जीत होती, असं म्हणत उद्धव ठाकरेंना धीर देण्याचा प्रयत्नही त्यांनी यावेळी केला. तसेच या नात्याला आम्ही पुढे नेऊ, असे म्हणत आगामी निवडणुकीत ठाकरेंबरोबर युती करण्याचे संकेतही यावेळी त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com