Kasba By-Election : रासनेंचा पराभव निश्चित : पण तो कमी मतांनी व्हावा यासाठी मुख्यमंत्री प्रचारात ; धंगेकरांचा मिश्किल टोला!

Kasba By-Election : मुक्ताताईंचे नियोजित कामे करून त्यांना श्रद्धांजली वाहणार..
Kasba By-Election :
Kasba By-Election : Sarkarnam
Published on
Updated on

Kasba By-Election : कसबा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा कमीत कमी मतांनी पराभव व्हावा, यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जात आहे, असा मिश्किल टोला महाविकासआघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी लगावला आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात काटे की टक्कर आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळी कामं सोडून कसब्यात फिरत आहेत, असेही धंगेकर म्हणाले.

विजय मिळाल्यास काय भूमिका असेल? असे विचारले असता, धंगेकर म्हणाले, "एकदा निवडणूक जिंकल्यानंतर विजयी उमेदवाराचे सत्कार-सन्मानाचे कार्यक्रम होत असतात. मात्र आपल्याला विजय मिळाल्यास सत्काराचे कार्यक्रम वगैरे न घेता, थेट कामाला सुरूवात करणार आहे."

Kasba By-Election :
Chinchwad By-Election : 'पराभव दिसू लागल्याने भाजप गुंडगिरीवर उतरली' : रोहित पवारांचे टीकास्त्र!

"दिवंगत मुक्ता टिळक यांनी या मतदारसंघात कामे केली आहेत. त्यांचे पुढचे नियोजित कामे पूर्ण करून मी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे, असेही धंगेकर म्हणाले. "कसब्याची ही निवडणूक आता कसबेकरांनीच हातात घेतली आहे. आणि माझा कसबेकरांवर पूर्ण विश्वास असल्याने, माझा विजय हा निश्चित आहेच," असा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केला.

Kasba By-Election :
Kasba By-Election : लोकसेवा असो किंवा निवडणूक आयोग निकालाला महत्त्व : मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान !

दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता संपला आहे, आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते कसब्यात ठाण मांडून होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ कसब्यामध्ये रोड शो केला, तर आघाडीतील नेत्यांनी धंगेकरांचा प्रचार करताना दिसले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com