Ajit Pawar : अजित पवार संतापताच फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी; सभागृहात नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis : ''विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेली बाब गंभीर आहे.''
Ajit Pawar and Devendra Fadnavis
Ajit Pawar and Devendra Fadnavis Sarkarnama

Mumbai : राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. मात्र, अनेकवेळा लक्षवेधी सुरू असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गैरहजर असतात. त्यामुळे लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ येते. याच मुद्यावरून आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

''गैरहजर मंत्र्यांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी'', असे खडेबोल अजित पवारांनी सुनावले. यावर उत्तर देताना विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेली बाब गंभीर असून मी मंत्र्यांचं अजिबात समर्थन करणार नाही, असं सांगत फडणवीसांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली.

Ajit Pawar and Devendra Fadnavis
Diliprao Deshmukh News : राज्य सहकारी साखर संघाच्या तज्ञ संचालकपदी दिलीपराव देशमुख..

नेमकं काय घडलं?

लक्षवेधी सुरू असताना मंत्री गैरहजर असल्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले. त्यानंतर पवार म्हणाले, ''तुम्ही मंत्रिपदासाठी पुढे येता. आम्हाला मंत्री करा असं म्हणता. मग मंत्री झाल्यावर सभागृहाची परंपरा का पाळत नाहीत?''

''तुम्ही तुमचं काम का करत नाहीत? हे अत्यंत गलिच्छपणाचे काम सुरू आहे. जे मंत्री गैरहजर राहतात त्यांना विधिमंडळाच्या कामकाजात रस नसल्याचे दिसून येत आहे'', असं म्हणत त्यांनी मंत्र्यांना चांगलच फैलावर घेतलं.

Ajit Pawar and Devendra Fadnavis
Kapil Patil : जुनी पेन्शन घालवत आहेत, आता हे सरकारच अदानीला देऊन टाका…

यावेळी संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे पवार म्हणाले, ''मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना रात्री दोनपर्यंत काम करायची सवय आहे. मात्र, चंद्रकांत पाटील हे तर रात्रीपर्यंत जागत नाहीत. मग त्यांनी तरी सकाळी सभागृहात आलं पाहिजे''.

''अनेकवेळा कामकाज सुरू असताना संसदीय कामकाज मंत्री देखील सभागृहात उपस्थित नसतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस तुम्ही सिनिअर आहात. मात्र, तुमचं देखील लक्ष नाही'', असं पवार म्हणाले.

Ajit Pawar and Devendra Fadnavis
Mla Satish Chavan News : डमडम तलावातील बाधित शेतकऱ्यांना तीन महिन्यात मोबदला देणार..

यावर फडणवीस म्हणाले, ''विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेली बाब गंभीर आहे. त्यामुळे मी मंत्र्यांचं समर्थन करणार नाही. मात्र, आज सभागृहात जो काही प्रकार घडला त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. पण यानंतर सर्व मंत्र्यांना वेळेवर सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या जातील, असं मी सभागृहाला आश्वस्त करतो'', असं फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com