Manoj Jarange Speech : जरांगे पाटलांचा अल्टिमेटम अन् भाजपकडून फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ ट्विट

Devendra Fadnavis On Maratha Aarakshan : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्यानंतर भाजपचे ट्विट चर्चेत आले आहे.
Devendra Fadnavis and Manoj Jarange
Devendra Fadnavis and Manoj Jarange Sarkarnama

Mumbai News: जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची शनिवारी भव्य सभा झाली. या सभेत जरांगे पाटलांनी सरकारला इशारा देत मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही, सरकारकडे 40 दिवसांतील फक्त 10 दिवस उरलेत, या 10 दिवसांत मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्या, अन्यथा आंदोलनाची पुढची दिशा 22 ऑक्टोबरला ठरवणार, असा थेट अल्टिमेटम दिला. यानंतर लगेचच महाराष्ट्र भाजपच्या एक्सवर (ट्विटर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जुना एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis and Manoj Jarange
Maratha Reservation News : मराठ्यांचा आग्या मोहोळ शांत आहे, त्याला उठवू नका; जरांगे पाटलांचा सरकारला गर्भित इशारा !

केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आता मराठ्यांचे हाल करू नयेत, आमचा ओबीसीत समावेश करा. आता दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नाही. सरकार बरोबरच्या चर्चेत ठरलं होतं की महिनाभराच्या वेळात आरक्षण देऊ, आता सरकारने दिलेला शब्द पाळवा, अन्यथा आम्ही पुढची दिशा ठरवणार, असे जरांगे पाटील म्हणाले. त्यांच्या सभेनंतर महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून फडणवीसांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे फडणवीस म्हणताना दितस आहेत.

या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस हे भाषण करताना दिसून येत आहेत. यामध्ये फडणवीस म्हणताहेत की, "मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे. ही मागणी योग्य आहे. मागच्या काळात आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. आम्ही दिलेले आरक्षण हायकोर्टाने वैध ठरवले होते.

मात्र, आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यावेळी असणारे सरकार आरक्षण टिकवू शकलं नाही. मात्र, आम्हाला विश्वास आहे की, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊन दाखवू. आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे", असे फडणवीस व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता असून, मनोज जरांगे पाटलांची सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला. त्यामुळे आता सरकार मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Devendra Fadnavis and Manoj Jarange
Manoj Jarange Speech : मोदी-शाहांनी फडणवीसांना समज द्यावी; जरांगे पाटलांनी सुनावले खडेबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com