Ashish Shelar News : 'उद्धव ठाकरे लंडनला का लपून बसले?' , आशिष शेलारांनी डिवचलं

Uddhav Thackeray : नालेसफाई होताना उबाठाचा माणूस दिसला का? कुठल्या बिळात लपून बसलात? मुंबईवर यांचे पुतणा मावशीचे प्रेम आहे.ही श्रेयवादाची लढाई नसून ही मुंबईकरांना श्रेयाची लढाई आहे, असे शेलार म्हणाले.
Ashish Shelar, Uddhav Thackeray
Ashish Shelar, Uddhav Thackeray Sarkarnama

Mumbai Political News : मुंबईतील एकेक जागा जिंकण्यासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ठाकरेंच्या शिवसेनेशी झुंज देत आहे. या लढतीत दोन्ही गटामधील संघर्ष टोकाला जात असतानाच साऱ्या पक्षाचे नेते एकमेकांचा पाणउतारा करीत आहेत. मुंबईतील निवडणूक संपल्यानंतरही आरोप प्रत्यारोप, टीकाटीपण्णीची मालिका सुरुच आहे. अशातच प्रचार आटोपल्यानंतर नेते सुट्टीच्या माहोलमध्ये आहेत. त्यावरूनच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.

ठाकरे Uddhav Thackeray लंडनला का लपून बसलेत, असा खोचक सवाल शेलार यांनी ठाकरेंना केला. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे लंडनला जाणार असल्याच्या चर्चा होत्या. आशिष शेलार हे मुंबईतील नालेसफाईची पाहणी करत आहेत. त्यावेळी त्यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. स्वतःला मर्दांचा पक्ष म्हणून घेणारे उद्धव ठाकरे कुठे आहे. लंडमधून ते नालेसफाई पाहत आहेत का? उद्धवजी, आदित्यजी Aaditya Thackeray लंडनला लपून बसलेत, असा टोला शेलार यांनी लगावला.

Ashish Shelar, Uddhav Thackeray
Sharad Pawar Politics: टक्केवारीसाठी बंडखोरी केलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश नाही!

नालेसफाई होताना उबाठाचा माणूस दिसला का? कुठल्या बिळात लपून बसलात? मुंबईवर यांचे पुतणा मावशीचे प्रेम आहे. मुंबईवर प्रेम आहे म्हणता ना मग लंडनमध्ये का लपून बसेलत उद्धवजी आदित्यजी याचे उत्तर अनिल परबांनी द्यावे, असे थेट आव्हान शेलार यांनी दिले. ही श्रेयवादाची लढाई नसून ही मुंबईकरांना श्रेयाची लढाई आहे, असे देखील शेलार यांनी ठणकावून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंचा परबांना पाठींबा नाही

अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावरून परब यांची उमेदवारी लंडमधून जाहीर झाली का? असा टोला आशिष शेलार यांनी लगावला. तसेच परब यांना पुष्पगुच्छ न देता उमेदवारी घोषित झाली म्हणजे ठाकरेंचा परबांना पाठींबा नाही, असा संदेश जातो. असे शेलार म्हणाले.

Ashish Shelar, Uddhav Thackeray
MLC Election 2024 : मुंबई पदवीधरमधून ठाकरेंचा निष्ठावंत शिलेदार मैदानात, तर शिक्षक मतदारसंघातून...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com