मुंबई : बारा आमदारांच्या निलंबनाच्या चर्चेपासून विधीमंडळात आक्रमक राहिलेले माजी मंत्री आणि निलंबनाच्या यादीत पहिल्याच क्रमांकावर असलेले भाजपचे (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) हे आमदारांवरील कारवाई टळेपर्यंत म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यापर्यंत आघाडीवर होते. सरकारच्या या कारवाईला आव्हान देण्याच्या निर्णयापासून याचिकेचा मसुदा, ज्येष्ठ वकिलांची फौज, त्यासाठी कायदे, त्याचा आधार आणि दुसरीकडे निलंबित आमदारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वास देण्यापर्यंतच्या मोहिमेत शेलारांचा पुढाकार होता. या प्रक्रियेत शेलार यांच्या वकिली फायदेशीर ठरली.
राजकारणीतील बारकावे जाणून असलेले शेलार हे त्यांच्या वकिलीच्या व्यवसायातही अनुभवी मानले जातात. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 'ओबीसी'च्या मुद्यावरून झालेल्या गोंधळातून १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करून ठाकरे सरकारने भाजपला धडा शिकविला, आधीच या सरकारवर खार खारून असलेल्या भाजपच्या नेत्यांनी सरकारविरोधात सभागृहात आणि सभागृहाबाहेरही रणकंदन माजविले. या कारवाईला जशास तसे उत्तर देण्याची पवित्रा घेत, सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, त्यासाठी पुढाकार घेतलेल्या शेलारांनी ही लढाई जिंकेपर्यंत आजपर्यंत कायम ठेवला. विधीमंडळाच्या कामकाजात न्यायालयात हस्तक्षेप करता येणार नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जात असतानाच शेलारांनी आपली वकिली पणाला लावली आणि आपल्यासह सहकारी आमदारांचे निलंबन रद्द व्हावे, पुन्हा वकिलीचा अभ्यास पणाला लावला. ही लढाईला नेमक्यात कोणत्या मुद्दयाच्या आधार असेल, ही बाब पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पटवून देण्यासह या लढाईत अडचणी येणार नाहीत, याची दक्षता शेलार हेच घेत राहिले. त्यात संबंधित घटकांशी विशेषत: वरिष्ठ वलिकांशी शेलार हेच नेहमीच बोलत असायचे.
या निलंबित आमदारांना राज्यसभेच्या निवडीच्या वेळी मतदान करता येईल की नाही, याची चर्चा होती. विधीमंडळाच्या आवारातच येण्याची बंदी असल्याने या आमदारांना मतदान करता येणार नाही, अशी समजूत होती. मात्र, निवडणूक आयोगाकडे त्यासाठी बाजू मांडून मतदानाचा हक्क मिळवून शेलार यांनी पहिला लढा जिंकला होता. ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे आमदारांना सभागृहात येण्याची वेळी आली नाही.
या लढाईबाबत शेलार म्हणाले, "मुळात कायदे आणि त्याचे फायदे-तोटे जाणून असल्याने न्यायालयात जाणे सोपे होते, कायदे घेऊन आम्ही ही लढाई लढली. प्रत्येक घटकांशी जोडून योग्य समन्वय ठेवला. त्याचा परिणाम निकालात झाला आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.