Varsha Gaikwad : 'स्वसंरक्षण की हत्या?' ; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी वर्षा गायकवाडांचा पोलिसांना सवाल!

Varsha Gaikwad on Akshay Shinde Encounter : पोलिस आणि राज्याच्या गृहखात्यात नक्की चाललंय तरी काय? असा सवालही केला आहे.
Varsha Gaikwad : 'स्वसंरक्षण की हत्या?' ; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी वर्षा गायकवाडांचा पोलिसांना सवाल!
Sarkarnama
Published on
Updated on

Akshay Shinde Encounter and Congress MP Varsha Gaikwad : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे आज एन्काऊंटर झाले. प्राप्त माहितीनुसार अक्षयने पोलिसांचं बंदूक हिसकावून घेत तीन गोळ्या झाडल्या यानंतर पोलिसांकडून झालेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला, असं सांगितलं जात आहे. शिवाय यामध्ये एक पोलिसही जखमी झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडीली असून, विरोधकांनी यावरून पोलिस प्रशासन आणि सरकारवर टीका सुरू केली आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया देताना, स्वसंरक्षण की हत्या? असा सवाल पोलिसांना केला आहे.

वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे म्हटले आहे की, 'एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गरड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? आणि ते जरी घडलं असेल तर पोलिसांनी त्याला आटोक्यात आणून का पकडता आलं नाही? हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पोलिस आणि राज्याच्या गृहखात्यात नक्की चाललंय तरी काय?'

Varsha Gaikwad : 'स्वसंरक्षण की हत्या?' ; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी वर्षा गायकवाडांचा पोलिसांना सवाल!
Badlapur rape case Update : मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वतःवर गोळ्या झाडल्या; आत्महत्या की एन्काऊंटर?

तसेच, 'बदलापूर प्रकरणात याआधीच पोलिसांवर प्रकरण दडपण्याचे, गुन्हा नोंदवण्यास उशीर करण्याचे गंभीर आरोप झालेले आहेत. या प्रकरणातील शाळेचे संस्थापक तुषार आपटे यांचे भाजपाशी संबंध असून तो अजूनही फरार आहे. त्याला अजून पोलीस का पकडू शकले नाहीत? आरोपीच्या आईने आणि भावाने दिलेले जवाब कसं दुर्लक्षित करता येतील?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय 'त्यामुळे जागच्या जागी हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी आणि या प्रकरणाचे धागे दोरे ज्यांच्या दिशेने जात आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी तर अक्षय शिंदेची हत्या करण्यात आलेली नाही ना? याची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Varsha Gaikwad : 'स्वसंरक्षण की हत्या?' ; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी वर्षा गायकवाडांचा पोलिसांना सवाल!
Devendra Fadnavis On Badlapur Encounter: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; 'पोलिसांनी...'

याचबरोबर 'राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजलेत, पण राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे सत्ताकारणात व्यग्र आहेत. खरं तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा दिला पाहिजे.' असंही खासदार गायकवाड यांनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com