काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्या या पक्ष प्रवेशावर काँग्रेसमधून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी भूमिका मांडल्या आहेत.
Ashok Chavan यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर अनेक प्रतिक्रिया सामोर आल्या आहेत. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना परत येण्याची साद घातली आहे. अशोक चव्हाण यांना पक्षात खूप जबाबदारी आणि संधी देण्यात आली. त्यांच्या मागील जे वरिष्ठ नेते होते त्यांना डावलून अशोक चव्हाण यांना आम्ही संधी दिली. मात्र, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तिथे त्यांना मागच्या फळीतले स्थान मिळेल. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि आमच्या पक्षात यावं. उलट आम्ही आमच्या पक्षातला माणूस भाजपचे नेते आमच्या पक्षात यावे यासाठी पाठवला आहे, अशी साद नाना पटोले यांनी घातली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामधील हा वाद वारंवार समोर येत आहे. काही आठवड्यांपूर्वी नाना पटोले यांची पत्रकार परिषद सुरू असताना विजय वडेट्टीवार मध्येच उठून निघून गेले. मात्र, आज अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरदेखील त्यांनी भाष्य केले आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला म्हणजे आमच्यावर आभाळ कोसळलं असं नाही. अशोक चव्हाण तिथे गेले म्हणजे ते आता चायना माल होणार आहेत. भाजपमध्ये कोणीही गेलं की ते चायना माल होतात. त्यांचा उपयोग करून काहीच दिवसांत टाकून दिलं जातं, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही अशोक चव्हाणांचा समाचार घेतला आहे. अशोक चव्हाण हे डरपोक आहेत, ते घाबरून गेले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा बाहेर काढला. त्यांनी आज पक्ष प्रवेश केला आहे. आता त्यांना क्लीन चिट मिळेल. काँग्रेस पक्षाने त्यांना आजवर इतकी संधी दिली. त्यांच्यावर ईडी किंवा सीबीआयचा दबाव असेल. मात्र, ते गेल्याने आम्ही हरणार नाही. सगळे मिळून आता आम्ही काँग्रेस पक्ष पुन्हा महाराष्ट्रामध्ये उभा करू, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.