Rajya Sabha Election : अशोक चव्हाण काँग्रेसचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार? राज्यसभेला क्राॅस व्होटिंग?

Ashok Chavan On Rajay Sabha Election : 'काँग्रेसची राज्यसभेची एकमेव सीट भाजप हिसकावणार?'
Rajya Sabha Election
Rajya Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ते भाजपकडून राज्यसभा खासदार म्हणून नवीन राजकीय इनिंग सुरू करण्याची शक्यता आहे. 10 जून 2022 रोजी भाजपने महाराष्ट्रात आपल्या कोट्यापेक्षा एक जागा अधिक राज्यसभेची जिंकली. त्याचीच पुनरावृती होण्याची आता शक्यता आहे. कारण अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे जवळपास डझनभर आमदारही पक्ष सोडू शकतात, असे बोलले जात आहे. यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajya Sabha Election
Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी सोडला काँग्रेसचा 'हात', आजच देणार भाजपला 'साथ'?

भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते. राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एकूण 6 पैकी 3 जागा भाजप जिंकण्याच्या स्थितीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक जागा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला एक जागा देऊन सर्व जागा महायुतीच्या पारड्यात पाडण्याची योजना सुरू आहे. खरंतर काँग्रेस राज्यसभेची एक जागा जिंकण्याच्या स्थितीत होती. मात्र, आता चव्हाणांच्या जाण्याने काँग्रेस ही जागा जिंकणार का? याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

Rajya Sabha Election
Ashok Chavan : जिकडे अशोक चव्हाण, तिकडे समर्थक आमदार? नांदेड काँग्रेसची वाट बिकट...
Rajya Sabha Election
Ashok Chavan in BJP : भाजप प्रवेशानंतरही अशोक चव्हाण काँग्रेसमध्येच; म्हणाले 50 वर्षांची सवय सुटणार नाही...

15 फेब्रुवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख -

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी असून, त्याआधीच अशोक चव्हाणही अर्ज भरण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतांच्या गणिताबाबत बोलायचे झाल्यास राज्यात 285 आमदार आहेत. राज्यसभेच्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक जिंकण्यासाठी 42 मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीचा विचार करता काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 11 आमदार आहेत, तर दुसरीकडे एनडीएकडे एकट्या भाजपचे 104 आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे 39, तर अजित पवारांकडे 44 आमदार आहेत.

Rajya Sabha Election
Ashok Chavan in BJP : अशोक चव्हाण केंद्रात मंत्री होणार ?

काँग्रेसची अडचण होईल का ?

आता राज्यसभेच्या गणिताबद्दल बोलायचे झाले, तर भाजप सहज 3 जागा जिंकेल. याशिवाय शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक जागा जिंकण्याच्या स्थितीत आहेत. काँग्रेस स्वबळावर एक जागा मिळवू शकते.

मात्र, भाजप आणि अशोक चव्हाण यांचा गेम प्लॅन काम करू शकतो. भाजप आणखी एक उमेदवार उभा करू शकतो आणि अशोक चव्हाण यांना पाठिंबा देणाऱ्या डझनभर आमदारांचे क्रॉस व्होटिंग करून भाजपला यश मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

R

Rajya Sabha Election
Ashok Chavan : गेल्या वर्षीची अफवा, यंदा खरी ठरली; भाजपबाबत अशोक चव्हाण काय म्हणाले होते ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com