Mumbai News : राज्याचे माजी मुख्यमंत्री व एकेकाळी काँग्रेसचे मातब्बर नेते राहिलेले अशोक चव्हाण यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश करत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. भाजपत प्रवेश करताच त्यांची लगोलग राज्यसभेवर वर्णी लागली. चव्हाणांना भाजपमध्ये ओढून आणण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. आता भाजपवासी झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा हाच महाराष्ट्राचा बदलेल्या परिस्थितीला जबाबदार असल्याचे सांगून आपले मन मोकळे केले आहे. (Maharashtra Political News)
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक चव्हाण म्हणाले, "काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणे ही सर्वात मोठी चूक होती. त्यांच्या या निर्णयाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारसह महाविकास आघाडीतील बरेच नेते नाराज झाले. विधानसभेला अध्यक्षच नाही असं कसं?"
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्या लक्षात घेतल्या तर पटोले (Nana Patole) अध्यक्ष राहिले असते तर आघाडीचं सरकार गेलंच नसतं. आज ज्या गोष्टी घडून आल्या ते टाळताही आल्या असत्या. अध्यक्षपदाचा राजीनामा देणे ही फार मोठी चूक होती. महाराष्ट्राच्या राजकारणाने कलाटणी घेतली ती याच घटनेमुळे असं मला आजही ठामपणे वाटतं, असेही अशोक चव्हाण म्हणाले. (Latest Political News)
'काँग्रेस सत्तेत असतानाही मी दहा वर्षे सत्तेच्या बाहेर होतो. पदावर नव्हतो. नंतर प्रदेशाध्यक्षपद मिळाले. सत्ता हा हेतू नाही. सत्तेने फरक पडतोच. लोकांना कामं हवी आहेत. तुम्ही सत्तेत आहात की नाही, याच्याशी त्यांना घेणं देणं नसतं. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे सत्तेत असताना लोकांचं काम करता येतं. देशपातळीवर मोदींबाबत वलय आहे. ते काम करत आहेत', असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.