Ashok Chavan : भाजपवाले वर्षानुवर्षे विरोधी बाकांवर बसले, काँग्रेसच्या नेत्यांना लगेच सत्ता का लागते? चव्हाण म्हणाले...

Ashok Chavan Latest Statement : "आरएसएसची काम करण्याची पद्धत वेगळी आहे..."
Ashok Chavan Latest Statement :
Ashok Chavan Latest Statement : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे माजी मुख्यमंत्री व एकेकाळी काँग्रेसचे मातब्बर नेते राहिलेले अशोक चव्हाण यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश करत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. भाजपत प्रवेश करताच त्यांची लगोलग राज्यसभेवर वर्णी लागली. चव्हाणांना भाजपत ओढून आणण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. आता भाजपवासी झाल्यानंतर आपण विरोधी पक्षात का राहिलो नाही, याबाबत खुद्द त्यांनीच खुलासा केला आहे. (Latest Marathi News)

Ashok Chavan Latest Statement :
Nanded Congress : अशोक चव्हाण भाजपत जाताच नांदेडमध्ये काँग्रेस आक्रमक; उचलले मोठे पाऊल

अशोक चव्हाण यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी आपण भाजपसोबत सत्तेत का आलो? याबाबत आपली भूमिका मांडली आहे. "स्वातंत्र्यापासून देशात काँग्रेस सत्तेवर होती. तेव्हा भाजप किंवा जनसंघ हे वर्षानुवर्षे विरोधी पक्षात बसले. आता मागील केवळ दहा वर्षे भाजप सत्तेत आहे, तर अशावेळी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची इतकी घालमेल का व्हावी? त्यांच्या अनेक नेत्यांना सत्तेत जाऊन बसावं का वाटतं? काही काळ काँग्रेसचे नेते विरोधात बसू शकत नाहीत का? असा भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाणांना विचारण्यात आला. (Ashok Chavan Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavan Latest Statement :
Nanded Congress : कोणता झेंडा घेऊ हाती? अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड काँग्रेस सैरभैर ?

या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले, "भाजपची कदाचित काम करण्याची पद्धती ही वेगळी आहे, त्यांचे एकंदरीत कमिटमेंट या वेगळ्या आहेत. उद्या भाजपचं (BJP) राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीला आहे. तिथे मला निमंत्रित करण्यात आलं. आज मतदारांच्या आकांक्षा वाढत आहेत. वेगळ्या पद्धतीने ते विचार करतात. लोकांना आता काम पाहिजे आहे. तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही काम केलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत काम केलं पाहिजे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

मोदींच वलय -

'काँग्रेस सत्तेत असतानाही मी दहा वर्षे सत्तेच्या बाहेर होतो. पदावर नव्हतो. नंतर प्रदेशाध्यक्षपद मिळाले. सत्ता हा हेतू नाही. सत्तेने फरक पडतोच. लोकांना कामं हवी आहेत. तुम्ही सत्तेत आहात की नाही, याच्याशी त्यांना घेणं देणं नसतं. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे सत्तेत असताना लोकांचं काम करता येतं. देशपातळीवर मोदींबाबत वलय आहे. ते काम करत आहेत', असे अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.

(Ashok Chavan Latest Statement)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com