मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मांडलेल्या औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचं नामांतर करण्याचा ठरावास विधानसभेने आज मंजुरी दिली. त्याबाबतची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आले आहे. या शिवाय नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव देण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. (Assembly approves name change of Aurangabad, Osmanabad)
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचाही ठराव दोन वर्षांपूर्वी झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारने या ठरावांसोबत त्याचाही पाठपुरावा करावा, अशी मागणी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अनुक्रमे संभाजीनगर आणि धाराशिव असे करण्यात यावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत हेाती. मागील सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो ठराव मंजूर केला होता. पण, नव्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तो ठराव रद्द केला हेाता. त्यानंतर या सरकारने पुन्हा तो ठराव केला होता. तो आज विधानसभेत मांडून मंजूर करून घेतला.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळचं नामांतर दी. बा. पाटील करण्याच्या प्रस्तावालासुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचे ठराव मंजूर झाल्यानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही एक सूचना केली. ते म्हणाले की, दि. बा. पाटील विमानतळाच्या नावाचा आज ठराव झाला आहे. तसेच, छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचाही ठराव दोन वर्षापूर्वी झाला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सरकारने या ठरावांसोबत त्याचाही पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर ते नावही देण्यात यावं. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत तातडीने पाठपुरावा करण्यात येईल, असे उत्तर दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.