Congress News : एक निर्णय अन् वसईमध्ये 29 वर्षांपासून काँग्रेस विजयाच्या प्रतीक्षेत

Reasons for Congress failure: मुंबईतील वसई आणि पालघरमध्ये काँग्रेसला यश का मिळत नाही, याचे उत्तर काँग्रेस शोधणार आहे.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभेच्या निवडणुकीला आता रंग चढू लागला आहे. यातच राजकीय चर्चा नाही वेग येऊ लागला आहे. एकेकाळी वसईवर काँग्रेसचे राज्य होते.

29 वर्षांपूर्वी ते राज्य खालसा झाले असून , त्यावेळचा युवा आमदार हितेंद्र ठाकूर वसईचे काँग्रेसचे शेवटचे आमदार ठरले होते. त्यानंतर गेल्या 29 वर्षात काँग्रेसला ही जागा जिंकता आलेली नाही.

स्वातंत्र्यानंतर वसईमध्ये सातत्याने काँग्रेसचे (Congress) राज्य राहिले होते. अण्णासाहेब वर्तक, भाऊसाहेब वर्तक आणि तारामाई वर्तक यांनी वसई विधानसभेचे नेतृत्व केले होते. पुलोदच्या काळात जनता दलाच्या पंढरीनाथ चौधरी यांनी तारामाई वर्तक यांचा पराभव केला होता.

त्यानंतर झालेल्या निवडणुकीत तारामाई वर्तक यांनी साथी पंढरीनाथ चौधरी यांचा पराभव करून पुन्हा वसईमध्ये काँग्रेस जिवंत केली होती. परंतु त्यांचे राज्य पुढच्या निवडणुकीत जनतादलाचे डॉमनिक घोन्सालवीस यांनी खालसा केले. 1990च्या निवडणुकीत त्यावेळचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेले हितेंद्र ठाकूर यांनी डॉमनिक घोन्सालवीस यांना पराभव केला होता.

Congress News
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातच होणार पहिली 'राजगर्जना'; निशाण्यावर शिंदे की..?

मध्यतंरीच्या काळात हितेंद्र ठाकूर यांच्यावर टाडा लागल्याने त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले होते. पण ही चूक काँग्रेसला चांगलीच महागात पडली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर असलेले युवा नेते आणि ज्येष्ठांनी हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. 1995 च्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर अपक्ष म्हणून निवडून आले.

Congress News
Mahayuti News : महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली; बंडखोर उमेदवार नाॅट रिचेबल

हितेंद्र ठाकूर 2009च्या निवडणुकीत (Election) उभे राहिले नसल्याने, त्यावेळी विवेक पंडित शिवसेनेच्या पाठिंब्यावर आमदार झाले होते. परंतु 2014 च्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी विवेक पंडितांचा पराभव केला आणि ते पुन्हा बहुजन विकास आघाडीतर्फे आमदार झाले. 2009चा अपवाद सोडल्यास दुसऱ्या पक्षाला याठिकाणी आपले खाते उघडता आले नाही. तसेच गेल्या 29वर्षात काँग्रेसला आपला उमेदवार निवडून आणता आला नाही.

त्याचबरोबर 2009मध्ये नव्याने तयार झालेल्या नालासोपारा आणि बोईसर विधानसभा मतदार संघातही काँग्रेसला यश मिळाले नाही. गेल्या तीन निवडणुकीत या जागा बहुजन विकास आघाडीने जिंकल्या आहेत. नालासोपारामध्ये क्षितिज ठाकूर यांनी विजयाचे हॅटट्रीक केली आहे, तर बोईसरमधून सुरवातीच्या दोन निवडणुकीत विलास तरे, तर आता राजेश पाटील यांनी विजय मिळविला आहे. हीच गत पालघर जिल्ह्यात काँग्रेसची आहे.

2009मध्ये उत्तर मुंबई आणि डहाणू लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला. पालघर जिल्ह्यात विधानसभेच्या सहा जागा असून यापैकी एकही जागा काँग्रेसला आतापर्यंत जिंकता आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसला जिल्ह्यात विजयासाठी मेहनत घेऊन पुन्हा पक्षाला 'जुने अच्छे दिन' आणावे लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com