Aditya Thackeray : संपत्तीने कोट्यधीश असलेले आदित्य ठाकरेंवर आहेत एवढे गुन्हे

Worli Assembly constituency: मुंबईतील वरळी मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवत असलेले आदित्य ठाकरेंची संपत्ती आणि त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती समोर आली आहे.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना मोठं शक्तीप्रदर्शन केले. महायुतीकडून ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली असून, राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळणार असल्याचं सांगितले जात आहे.

यामुळे वरळी मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल. आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगाला उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडील चल संपत्ती आणि त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीचा धुरळा महाराष्ट्रात शिगेला पोचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटपाच्या पहिल्या याद्या जाहीर झाल्या आहेत. पुढील काही दिवसांत आणखी उमेदवार जाहीर होऊन प्रचाराचा जोर वाढले. यातच काल गुरूपुष्यामृताचा योग साधून प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात देशाचं लक्ष लागलेल्या मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Aditya Thackeray
Shivsena Politics : अंतर्गत विरोधामुळे शिंदे गटातील 'या' आमदारांची उमेदवारी वेटिंगवर?

चल संपत्तीचे विवरण

आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी निवडणूक (Elaction) आयोगाला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे आणि दाखल गुन्ह्याचे विवरण दिले आहेत. आदित्य ठाकरेंकडे 15 कोटींपेक्षा अधिक चल संपत्ती आहे. ही संपत्ती ते कुठेही घेऊन जाऊ शकतात.

अचल संपत्ती म्हणजेच स्थावर मालमत्ता सहा कोटी चार लाख रुपयांची आहे. आदित्य ठाकरेंच्या बँकेत 2 कोटी 81 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. 5 लाख 50 हजार रुपये किंमतीचे शेअर त्यांच्याजवळ आहे. म्युचुअल फंडात आणि शेअर मार्केटमध्ये एकूण 10 कोटी 14 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Aditya Thackeray
Shivsena UBT : शिवडी मतदारसंघावरून ठाकरेसेनेत बंडखोरी? सुधीर साळवींच्या नाराजीवर राऊतांचं स्पष्टीकरण

स्थावर मालमत्ता

आदित्य ठाकरेंकडे 1 कोटी 91 लाख रुपयांचे सोनं आणि चांदी आहे. कर्जतच्या भिसेंगाव इथं 171 चौरसमीटर जमीन आहे. तसंच रायगड इथं काही एकर जमीन आहे. त्याचे आजचे बाजारमूल्य 1 कोटी 48 लाख 51 हजार रुपये एवढं आहे. आदित्य ठाकरेंच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर इथं 2 गाळे नावावर आहेत. आजचे त्याचे बाजारमूल्य 4 कोटी 56 लाख रुपये इतकं आहे.

दाखल गुन्ह्याची माहिती

आदित्य ठाकरेंविरोधात 1 गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांनी डिलाईड रोड खुला केला होता. त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे. याशिवाय 1 कोटी 91 लाख सात हजार 159 रुपयांचे दागिने आहेत. बँकमध्ये फिक्स रक्कम 2 कोटी 81 लाख 20 हजार 723 रुपये एवढी आहे. एलआयसीमध्ये 21 लाख 55 हजार 741 रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com