Shivsena UBT : शिवडी मतदारसंघावरून ठाकरेसेनेत बंडखोरी? सुधीर साळवींच्या नाराजीवर राऊतांचं स्पष्टीकरण

Shivadi Assembly constituency: शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने शिवडी विधानसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. शिवाय ते बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे.
Sanjay Raut, Uddhav Thackeray
Sanjay Raut, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 25 Oct : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने शिवडी (Shivdi Constituency) विधानसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

शिवाय ते बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. या सर्व चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावल्या आहेत. सुधीर साळवी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

त्यामध्ये लिहिलं आहे, 'माझ्या प्रिय, शिवडी विधानसभेतील निष्ठावंत शिवसैनिकांनो, मला तुमच्याशी बोलायचं आहे!' असं लिहित त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यावर राऊतांना प्रश्न विचारला असता त्यांनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सगळा विचार करूनच अजय चौधरी यांना उमेदवारी दिल्याचंही सांगितलं आहे.

माध्यमांशी संवाद साधातना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "एखाद्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त इच्छुक असतात. मात्र, साळवी रागावले आहेत नाराज आहेत असं वाटत नाही. सुधीर साळवी हे शिवसेनेपेक्षा वेगळी पर्सनॅलिटी नाही. इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही. अजय चौधरी ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत सगळा विचार करून उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली आहे.

Sanjay Raut, Uddhav Thackeray
NCP Second Candidate list : हार मानना नामंजूर है...! लोकसभेला पराभूत, भाजपचे प्रतापराव आता 'घड्याळा'वर विधानसभा लढणार

शिवसेनेत कुठेही बंडखोरी होणार नाही. काही नावात, जागेत बदल होऊ शकतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एखाद्या दुसऱ्या जागेवर पुन्हा चर्चा होईल. रामटेकच्या आणि सांगोलाच्या जागेवर शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. तिथं काय करायचं याचा निर्णय आम्ही घेणार आहोत."

दरम्यान, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "एक काळ असा होता की, भाजपचे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे नेते मातोश्रीवर येऊन जागावाटपाच्या चर्चा करायचे.

Sanjay Raut, Uddhav Thackeray
Zeeshan Siddique : काल बाबा सिद्दीकींसोबतचा 'तो' फोटो पोस्ट केला अन् आज 'NCP'त प्रवेश करत उमेदवारी केली 'फिक्स'

मात्र, आता फार गमतीशीर चित्र आहे. एकनाथ शिंदे तीन दिवसांपासून दिल्लीला जाऊन अमित शहांच्या उंबरठ्यावर बसले आहेत. तर महाविकास आगाडीचं जागावाटप ठरलं आहे आणि झालं सुद्धा आहे. शिवाय आमचे मित्र पक्ष नाराज होणार नाहीत एवढ्या जागा त्यांना सोडल्या आहेत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com